साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेरी शिवारातील शेरी-लोंढरी दरम्यानच्या पाझर तलावात शेरी आणि पहूर येथील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिकल मोटारच्या केबल चोरट्यांनी लांबविल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या सलग तिसऱ्यांदा इलेक्ट्रीक केबलच्या चोऱ्या आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पहूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली नाही. गेल्या वेळेस तक्रार दाखल करूनही काही एक फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच यावेळी तक्रार दाखल केली नसल्याचेही शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे चोरट्यांचा कडक बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सविस्तर असे की, शेरी आणि पहूर भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारी शेरी येथील धरणावर (पाझर तलाव) बसविलेल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने पिकांना मुबलक…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर चोपडा तालुक्यातील धानोरा गावात जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल १६ कोटी रुपये खर्चुन पाण्याच्या टाकीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिन्यात काम पूर्ण होऊन ग्रामस्थांना येत्या दोन महिन्यात शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहेत. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईस आळा बसणार आहे. संपूर्ण गावात उच्च दर्जाची डीआय पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. येत्या दोन महिन्यात ग्रामस्थांना पाणी पिण्यास मिळण्याची शक्यता आहे. कामाची पाहणी स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली आहे. धानोरा गावात सध्या चार-पाच दिवसाआड पाणी येते. ही परिस्थिती उन्हाळ्यात पंधरा दिवसांवर जात असते. तसेच कुपनलिका जळणे, पाण्याची पातळी खाली जाणे यामुळे पाण्याची…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरातील पोदार जिनियस इंटरनॅशनल स्कुल येथे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उमाकांत पाटील, प्रल्हाद बोऱ्हाडे, वासुदेव माळी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्य, नाट्य, ऑर्केस्ट्रा, शिवाजी महाराजांचे जीवन कार्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. तसेच छत्रपती शिवरायांचा जन्म ते राज्याभिषेक दाखविणारे नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. विविध संस्कारक्षम व मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या कौतुकाच्या उत्स्फूर्त टाळ्याही मिळविल्या. इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी प्रांजली माळी हिने शिवरायांची महती सांगणाऱ्या…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील दादासाहेब जी.एम.सोनार नगर येथे प्रती शेगावचे संत गजानन महाराज मंदिरात शिवजयंतीचे औचित्य साधत गजेश्वर महादेव मंदिरात नुकतीच महादेवाच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा अत्यंत उत्साहात पूर्ण झाल्याने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. गजेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा विधीत हवन, पीठ स्थापन, स्तपन विधी, जल दिवस, धान्य दिवस, पूर्णा आहुती अशोक भावे महाराज आचार्यत्व यांनी केली. वेदशास्त्र संपन्न देवेंद्र शास्त्री गडीकर, नितीन भावे महाराज, सारंग गुरुजी, शुभम गुरुजी, अरविंद गुरुजी, विनू गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत प्राणप्रतिष्ठा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलश रोहण ईश्वरदास महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. सोहळ्यात प्रा. आर.बी.पवार, ज्योती पवार, चेतन उपासनी,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहराला लागून असणाऱ्या खडकी शिवारातील एमआयडीसीमधील भारत वायररोप कंपनीच्या गोडाऊनमधून चोरी करणाऱ्या पाचोरा येथील तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, तिघांना चाळीसगाव न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला ४५ हजार ७५० रूपये किमतीचे इलेक्ट्रीक आणि पीपीकोर वायरचे सहा बंडले ताब्यात घेतले आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव येथील एमआयडीसीतील भारत वायर रोप कंपनीच्या गोडाऊनमधुन अज्ञात चोरट्यांनी ४५ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रीक वायरचे पाच बंडल आणि ७५० रुपये किमतीचे पीपीकोर वायरचे १ बंडल असा ४५ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत प्रिन्सकुमार श्रीराम नरेश गुप्ता यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच आणि शिवशाही फाउंडेशनतर्फे गुणवंत शिक्षकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी साने गुरुजी नूतन विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मारवड हायस्कुलचे निवृत्त प्राचार्य बी.एस.पाटील, तालुका विज्ञान मंडळाचे कार्याध्यक्ष तथा पिंपळे हायस्कुलचे विज्ञान शिक्षक जे.एस.पाटील, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, ग.स. पतपेढीचे माजी संचालक वाल्मिक पाटील, बाजार समितीचे माजी संचालक डी.ए.धनगर आदी उपस्थित होते. काटे पॅलेसमधील शिवशाही फाउंडेशनच्या कार्यालयात गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त उमेश काटे, राष्ट्रीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक पुरस्कार प्राप्त निरंजन पेंढारे, बहिणाबाई चौधरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील श्री.गो.से.हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त सादर केलेले ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ महानाट्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय, वेशभूषा आणि ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मंगळवारी सायंकाळी श्री.गो.से.हायस्कुलच्या प्रांगणात पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या संकल्पनेतून महेश कोंडीण्य लिखित आणि दिग्दर्शित ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ महानाट्याचा प्रयोग आयोजित केला होता. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून महानाट्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी संजय वाघ, व्ही.टी.जोशी, दगाजी वाघ, खलील देशमुख, भडगावचे माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, प्रा.भागवत महालपुरे, जिजाबाई पाटील, अभिमन्यू पाटील, शशिकांत चंदिले, मधुकर पाटील, सतीश चौधरी, प्रकाश पाटील, योगेश पाटील, किशोर डोंगरे, विश्वासराव…
साईमत, रायपूर, ता.जळगाव : वार्ताहर तालुक्यातील रायपूर येथील ग्रामपंचायतीत १ मे २०२२ रोजी सरपंच रजनी नितीन सपकाळे यांनी ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९चे कलमप्रमाणे अपात्र करावे, अशी मागणी रायपूर येथील मनोज दिलीप परदेशी यांनी केली आहे. त्यांनी अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पं.स.चे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतु कारवाईस संबंधितांकडून मुद्दाम टाळाटाळ होत असल्याचीच तक्रार लोकशाहीदिनात करण्याची वेळ तक्रारदारावर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जळगाव तालुक्यातील रायपूर येथील ग्रामपंचायतीत १ मे २०२२ रोजी सरपंच रजनी सपकाळे यांनी ग्रामसभा घेतली नाही. चौकशी अहवालासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पं.स.चे गटविकास…
साईमत, यावल : प्रतिनिधी शहरातील विकसित भागात कोट्यावधी रुपये खर्च करुन नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु ठेकेदार आणि यावल नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या संगनमताने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टाकलेल्या पाईपलाईनचे ठिकठिकाणी बारा वाजल्याने ‘रस्त्याची वाट लागली’ असल्याची स्थिती आहे. त्याठिकाणी पाईपलाईन कायम लिक होत असते. पर्यायी दुरुस्तीसाठी खड्डे खोदल्यानंतर रस्त्याचे ‘बारा वाजले’ आहेत. दरम्यान, नगरपालिका बांधकाम विभाग झोपले आहे का..? असा प्रश्न उपस्थित होत असून ‘डोळेझाक’ होत असल्याची ओरड होत आहे. शहरातील विकसित भागात पांडुरंग सराफ नगरमध्ये शंभर ते दोनशे मीटर अंतरात राजू तडवी, सरोदे सर, साई बॅटरी सर्व्हीसेस यांच्या घराजवळ दोन ठिकाणी आणि त्याआधी फैजपूर रस्त्यावर नगरपरिषदेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाघारी येथे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेच्या माध्यमातून आईस्क्रिम कोन निर्मिती आणि कुल्फी निर्मितीचा उद्योग युवकाने उभारला आहे. प्रकल्पाच्या कारखान्याचे उद्घाटन जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. वाघारी येथील युवा उद्योजक दीपक निरंजन उंबरकर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून ४० लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून आईस्क्रिम कोन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यात त्यांनी स्वतः ५० लाखांची गुंतवणूकही केली आहे. उद्घाटनप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ.अभिमन्यू चोपडे, मंडळ कृषी अधिकारी धनश्री चासकर, सरपंच माया…