साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर मंगळ ग्रह सेवा संस्थेला शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या मंगळवारी, १२ मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरीत होईल. समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने नेहमी सामाजिक जाणीवेचे उचित भान ठेऊन धार्मिकतेबरोबरच शिक्षण, कृषी, पर्यावरण, आरोग्य आदी क्षेत्रातही मंगळग्रह सेवा संस्था अविरत कार्य करत आहे. त्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन संस्थेस पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे असणार आहे. शासनाने १९७१-७२ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार…
Author: Sharad Bhalerao
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा, पत्ता खेळणाऱ्या ११ जुगाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या दोन फायटर कोंबड्यांसह पाच लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळ तालुक्यात कुऱ्हा गावी एका शेताच्या बाजूला सार्वजनिक जागी झुडपाजवळ १५ ते १६ जण कोंबड्यांच्या झुंज लावून त्यावर पैशांचा हार-जीतचा खेळ खेळताना दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार रुपये किमतीचे फायटर कोंबडे,…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी व्यावसायिक दुकानदाराने कालबाह्य झालेला खाद्यपदार्थाचा माल सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात उघड्यावर फेकल्याने शाळकरी मुलांनी त्याची चव चाखली. अशावेळी ते खाद्यपदार्थ खाणाऱ्या शाळकरी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाकडून कधी कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहणार आहे. शहरातील स्टेशन रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्याकडून आपल्या दुकानातील एक्सपायरी झालेला म्हणजेच कालबाह्य झालेला खराब खाद्य पदार्थांचा माल शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात फेकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे शहरातील लहान वयोगटातील शाळकरी मुलांनी कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची तसेच शितपेयाची चव चाखत असल्याचे समोर आले आहे. गोपाल नमकीन, बालाजी नमकीन, थंड पेय, अमर घी, फंटाचे…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथील नगरपालिकेतील घनकचरा प्रकल्पाबाबत ठेकेदाराची मनमानी व नगरपालिकेतील अधिकाऱ्यांची डोळेझाक प्रकरणी वरिष्ठ दखल घेऊन संबंधितांवर कधी कारवाई करतील? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. याप्रकरणी कोणाकोणाचे हात भाजले गेले त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून जनतेच्या पर्यायाने शासनाच्या पैशांची लूट थांबवावी. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरु लागली आहे. नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या गलिच्छ कारभाराबाबत शुक्रवारी ८ मार्च रोजी दैनिक ‘साईमत’ने ‘घनकचरा पेटवून संपवण्याचा अजब प्रकार : लाखो रुपयांची बिले मात्र खर्ची… डोळ्यावर पट्टी बांधून काम करण्याची नगरपालिकेची भूमिका’ अशा ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे नगरपालिका गोटात खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांनी वृत्ताचे स्वागत…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पहूर गावात यात्रोत्सव सुरू झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सकाळी श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी भाविकांना साबुदाण्याच्या प्रसादाचे वाटप केले. गेल्या १९ वर्षांपासून श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू आहे. पहुर आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान संगमेश्वर महादेव मंदिर सकाळपासूनच गर्दीने फुलले होते. ह.भ.प.रमेश महाराज…
साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर येथून जवळील पिंपळगाव कमानी (तांडा) येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबा देवीच्या मंदिरावर सभामंडपचे भुमीपूजन माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक रतन चव्हाण, शेंदुर्णीचे संजय गरुड यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या आमदार निधीतून सभामंडपाचे काम मंजूर झाले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, माजी जि.प.सदस्य अमित देशमुख, सरपंच प्रियंका चव्हाण, उपसरपंच- संदीप राठोड, पोलीस पाटील तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष इंदल चव्हाण, संचालक प्रल्हाद चव्हाण, माजी सरपंच अर्जुन राठोड, शेषमल राठोड, रामदेव बाबा मंदिराचे पुजारी मदन महाराज, सरपंच पती…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कवडीचाही फायदा झालेला नाही. मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून असल्याने गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकून शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिरसगाव येथे शेतकरी दिलीप पाटील यांनी गुरुवारी, ७ मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शासनाने दुष्काळाच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, तर मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मन्याड धरण परिसरात पर्जन्यमान चांगले होत नसल्यामुळे मन्याड धरण भरत नसल्यामुळे गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करावा, गिरणा धरण पावसाळ्यात भरल्यानंतर अतिरिक्त पाणी मण्याड धरणात टाकल्यास…
साईमत, धरणगाव/जळगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड केलेल्या ठिकाणी आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी उपजिल्हा रूग्णालय उभारले जावे, यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून पालकमंत्री एवढ्यावरच न थांबता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामाच्या ४० कोटींच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यांना मान्यता मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या मान्यतेसाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करून धरणगाववासीयांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राह्मणशेवगे, हिरापूर, माळशेवगे, तळेगाव, हातगाव, अंधारी, रोहिणी, करजगाव, तळोंदा प्र.दे., शिरसगाव, पिंप्री प्र.दे.बु., डोणदिगर, देवळी, आडगाव आदी २२ गावातील शेतकरी गिरणा- मन्याड नदी जोड प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या गावांपैकी बऱ्याच गावांना सध्या पिण्यासाठी टँकर सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने गुराढोरांचा प्रश्न आलाच तर शेतीपिकाला पाणी मिळणे तर कोसो दूर अशी परिस्थिती असल्याने अनेक गावच्या गाव पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत. तांडेच्या तांडे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाले आहेत. तीन-चार वर्षानंतर दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने गावांची पन्नास वर्षांपासून गिरणा- मन्याड नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे, अशी मागणी आहे. गिरणा धरण हे गिरणा नदीवर…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी बालकाचे अपहरण करून त्याच्या जीवाच्या मोबदल्यात ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींची खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा अपिलात रद्द करुन सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. हा खटला अमळनेर येथील सेशन कोर्टात चालला होता. ह्या निकालाविरुद्ध आरोपींनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सविस्तर असे की, अमळनेर येथील डॉ. निखिल बहुगूणे यांचा सातवीतील मुलगा पार्थ याचे गेल्या ३ जानेवारी २०१७ रोजी ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अमळनेर येथील महेश विनायक खांजोळकर, सुनील विनायक बारी, भरत दशरथ महाजन, शुभम उर्फ शिवम गुलाब शिंगणे, अनिल नाना भील आणि भटू हिरामण खांजोळकर अशा सहा आरोपींनी अपहरण केल्याचा आरोप होता. घटनेनंतर १०…