अमळनेरातील मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर मंगळ ग्रह सेवा संस्थेला शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या मंगळवारी, १२ मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरीत होईल. समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने नेहमी सामाजिक जाणीवेचे उचित भान ठेऊन धार्मिकतेबरोबरच शिक्षण, कृषी, पर्यावरण, आरोग्य आदी क्षेत्रातही मंगळग्रह सेवा संस्था अविरत कार्य करत आहे. त्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन संस्थेस पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे असणार आहे.

शासनाने १९७१-७२ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार योजना सुरु केलेली आहे. दरवर्षी ५१ व्यक्ती आणि १० संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यानुषंगाने पुरस्कारासाठी गठीत केलेल्या मुख्यमंत्री तथा मंत्री, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ अशा चार वर्षांकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची व सामाजिक संस्थांची वर्षनिहाय निवड करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील दहा संस्थांमध्ये मंगळग्रह सेवा संस्थेचा समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आणि विश्‍वस्त मंडळाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here