साईमत, भडगाव : प्रतिनिधी आचारसंहिता लागण्याच्या आधी भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये शाखांचा शुभारंभ करण्याचा आमचा संकल्प आहे. मतदारसंघातून पुरूषांच्या सोबतीने महिलांचाही वाढता कल मिळत असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले. त्या तालुक्यातील कजगाव-वाडे गटातील शिवसेना शाखांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. वैशाली सूर्यवंशी यांनी ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाची शाखा सुरू करण्यात येत आहे. आज या उपक्रमाच्या अंतर्गत सकाळी भडगाव तालुक्यातील कनाशी, वाडे, बांबरूड, गोंडगाव, घुसर्डी, सावदे, लोण, बोरनार, बोदर्डे व निंभोरा या गावांमध्ये शिवसेना शाखांचा शुभारंभ करण्यात आला. त्यातील प्रत्येक गावांमध्ये वैशाली सूर्यवंशी यांचे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्वाचे २१ प्रकार आहेत. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सदस्य समिती दिव्यांगत्वाचे प्रमाण ठरवुन तसेच प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील काही नवीन व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे अपंगत्व नसतांना ऑनलाईन फॉर्म सबमिट करून काही दलालांना हाताशी धरून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढीत आहेत. यापूर्वीही काही व्यक्तींनी काढलेले आहे. त्यानुसार ४० टक्के पासुनच्या पुढील दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळणाऱ्या व्यक्तींना शासनाचे लाभ घेता येतात. परंतु पुढे प्रमाणपत्रांची शहानिशा होत नाही. अशा प्रकारच्या लोहाऱ्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा आशयाची मागणी दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनाद्वारे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावाच्या रक्षणासाठी त्यांनी काम केले आहे. मात्र, त्यांना मिळणाऱ्या ६ हजार ५०० रुपये मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. यासाठी पोलीस पाटील संघटनांच्यावतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अधिवेशनादरम्यान मोर्चे काढण्यात आले. अनेक शासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या.अखेर आ.मंगेश चव्हाण आणि पोलीस पाटील संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राष्ट्रनायक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पहिल्या लढाऊ संघटनेचा म्हणजेच समता सैनिक दलाचा ९७ वा वर्धापन दिन चाळीसगाव येथे भव्य बाईक रॅली काढून बुधवारी साजरा करण्यात आला. राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वात निघालेल्या बाईक रॅलीचे आयोजन चाळीसगाव तालुका शाखेने केले होते. रॅलीत शेकडोंच्या संख्येने मोटार सायकल घेऊन युवा तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. दै.ग्रामस्थचे संपादक, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक किसनराव जोर्वेकर या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते झेंडा फडकवून रॅलीस रेल्वेस्टेशन येथून प्रारंभ करण्यात आला. रॅलीत ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव, देविदास जाधव, वसंत मरसाळे, सोमनाथ गायकवाड, रमेश भारती, अनिल पगारे, किरण खैरे, बाबुलाल शिरसाठ…
साईमत, यावल : प्रतिनिधी जळगाव आणि यावल तहसीलदार यांच्या संयुक्तिक पथकाची एकाच दिवशी, एकाच वेळेला शेळगाव बॅरेजजवळ बेकायदा अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन एक जेसीबी मशीन आणि वाळूने भरलेले एक डंपर यावलच्या तहसील कार्यालयात जमा केले. तसेच त्यातील दोन्ही वाहनांवरील वाहन चालक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत फरार झाल्याची माहिती यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडून मिळाली. ही बेधडक कारवाई मंगळवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याने अवैध गौण खनिज वाहतुकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव आणि यावल तालुक्याच्या हद्दीवर तापी नदीवरील शेळगाव बॅरेज परिसरातून तापी नदीपात्रातून विनापरवाना अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याची गोपनीय…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी जळगाव, धुळे किंवा छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता. सद्यस्थितीत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येऊन तेथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र, याबाबत संयुक्तिक असा प्रस्तावच राज्य शासनाकडे दिला न गेल्याने गेली अनेक वर्षे या मागणीला मूर्त स्वरूप आले नाही. मात्र राज्यात महायुती सरकार आल्यानंतर ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आ.मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती दिली. विविध विकासकामे व प्रकल्प यांच्या प्रलंबित फाईली युद्धपातळीवर शासनाकडून मंजूर होऊ लागल्या. ७ मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी शहरातील प्रमुख रस्ते त्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल मंदिरपर्यंत मेन रोड, ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक, राणी लक्ष्मीबाई चौक ते थाळनेर दरवाजा, आझाद चौक ते बोहरा गल्ली यासह अनेक वसाहतींमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अक्षरशा या रस्त्यांची चाळण झालेली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी स्थिती झालेली आहे. म्हणून हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. दिवसातून या रस्त्यांचा तीन ते चार वेळा कामानिमित्त वापर करावा लागतो. त्यामुळे मणक्यांमध्ये गॅप निर्माण होऊन पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, खांदे दुखणे यासारखे आजार शहरवासियांना जडलेले आहेत. चांगले रस्ते देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे तात्काळ…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील बारामती येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा नुकताच पार पडला. लाखोंचा खर्च करून रोजगार मिळून काय साध्य झाले. पश्चिम महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् आहेच. लाखो लोकांना त्याठिकाणी रोजगार आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात रोजगार मेळावा का नाही, त्याचे सरकारने जनतेस उत्तर द्यावे. उत्तर महाराष्ट्राची जीवनदायी ठरणारी नारपार योजना आणि नदी जोड प्रकल्पाकडे आपले दुर्लक्षच झाले आहे. निम्न तापी प्रकल्पांतर्गत तापी नदीवरील महाकाय पाडळसे प्रकल्पाची वेळेवर, सुप्रमा दिली असती तर केंद्राच्या योजनेत वेळेवर समावेश झाला असता. आपल्या विभागातील जलसंपदाचे अधिकारी यांना आपण सादरीकरण करण्याविषयी आपल्या स्तरावर योग्य ते आदेश द्यावेत. म्हणजेच केंद्राच्या योजनेत तातडीने…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मुख्य कार्यालय, पुणे यांच्या आदेशाने आणि नाशिकचे उपमहाव्यवस्थापक राजेंद्रकुमार जोशी यांच्या संकल्पनेने तसेच नाशिकचे प्रोग्रामर किरण उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा वखार केंद्राअंतर्गत सातगाव (ता.पाचोरा) आणि जरंडी (ता.सोयगाव) येथे ‘वखार आपल्या दारी’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी साठा अधीक्षक किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना अन्नधान्य साठवणुकीचे महत्त्व तसेच शेतमाल तारण योजना आदींची माहिती दिली. यावेळी उषा पाटील (सरपंच, सातगाव), स्वाती पाटील (सरपंच, जरंडी) यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृष्णा लोहार, अनिल खरे, प्रमोद कोठावदे, राहुल पारो आदींनी परिश्रम घेतले.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत मानसिक आरोग्यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यात महाविद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समाज कार्य महाविद्यालयाचे डॉ. जगदीश सोनवणे होते. अध्यक्षस्थानी प्रा.विजयकुमार वाघमारे होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वागत समारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. जगदीश सोनवणे यांनी ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये महिलांच्या मानसिक समस्या, सामाजिक जडणघडण व आजाराबाबत चर्चा केली. तसेच मानसिक आरोग्यावर विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून आणले.…