Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेतर्फे आयोजित आत्मनिर्भर युवती अभियाना अंतर्गत बुधवारी, २० मार्च रोजी डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी ‘महिलांमधील नेतृत्व गुण व विविध कला गुण सॉफ्ट स्किल’ विषयावर व्याख्यानाद्वारे कौशल्याविषयी युवतींना धडे दिले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.डॉ. जी. व्ही .पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एस. इंगळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.वाय .बी.पुरी, प्रा. स्वप्निल भोसले, सरोज…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कुलमध्ये २०२३ वर्षाचा शासकीय रेखाकला परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.टी. जोशी, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक आर.एल.पाटील, ए.बी.अहिरे, अंजली गोहिल, सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी, मनीष बाविस्कर, अजय सिनकर, आकाश वाघ उपस्थित होते. इलेमेंटरी परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये २४ विद्यार्थी उत्तीर्ण तर इंटरमिजिएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नुकत्याच झालेल्या अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथे जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एस.वाय. बीएस्सी. सेमिस्टर चौथे अभ्यासक्रम पुनर्रचनेवर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी होते.कार्यशाळेचे उद्घाटन फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. कार्यशाळेला जळगाव परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधून इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एम. एन.लिदुरे, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.एम.पी.भोळे, डॉ.के.डी. गायकवाड, डॉ.जी.डी. देशमुख, डॉ. एल.बी. पटले…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी रेल्वेचे काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या भरधाव डंपरने मालवाहू पिकअपला समोरून जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही वाहने रस्त्यावर उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन परप्रांतीय मजुर महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य २० ते २५ मजूर जखमी झाले. त्यातील १३ जखमींवर चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर आठ गंभीर मजूरांना धुळे येथे उपचारार्थ दाखल केले आहे. १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हिरापूर गावाच्या पुढे अरमान हॉटेलजवळ हा भयंकर अपघात घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पिकअप वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, हिरापूरजवळ तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू होते. याठिकाणी मध्यप्रदेश,…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील सिध्दार्थनगरमधील समाज मंदिराची अवस्था अतिशय जीर्ण झालेली आहे. समाज मंदिराची अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की, त्यामुळे केव्हाही जीवितहानी होऊ शकते. समाज मंदिरात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम नेहमी होतात. त्यामुळे लवकरात लवकर नवीन समाज मंदिर शासनाच्या दलित वस्ती निधीतून किंवा शासनाच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून किंवा यावल नगरपालिकेचे मागासवर्गीय ५ टक्के निधीतून तळ मजला, पहिला मजला आणि दुसरा मजला असे तात्काळ बांधुन मिळावे, अशी मागणी समस्त बौध्द समाजाच्यावतीने लेखी निवेदन देऊन केली आहे. अशा आशयाचे लेखी निवेदन जळगावचे जिल्हाधिकारी, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी, यावलच्या तहसीलदार, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनाही दिले आहे. निवेदनावर माजी नगरसेवक विजयकुमार…

Read More

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर पक्षी निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक आणि वसुंधरेचे अलंकार आहेत. त्यांचे संवर्धन व संरक्षण खूप महत्त्वाचे आहे. या विचाराने नागरिकांना प्रेरित करण्यासाठी पक्षी, वन्यजीव व वन संवर्धनासाठी कार्यरत वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त अडावद येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि कृष्णाजी नगर परिसरात यंदाही १०१ जलपात्रांसह इको फ्रेंडली घरट्यांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमात पक्षी अभ्यासक अश्‍विनी पाटील यांनी उपस्थितांना परिसरात आढळून येणाऱ्या सामान्य पक्षी व चिमण्यांची माहिती, त्यांची दिनचर्या व निसर्ग साखळीतील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. जलपात्र लावण्यासंबंधी मार्गदर्शन करून नियमित भरण्यासाठी नागरिकांना आग्रह केला. वनश्री दशरथ पाटील यांनी पक्षी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तीन तालुक्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख यांना बनावट व मागच्या तारखेची ३१ शिपाई भरती महागात पडली आहे. भरती बंदी असतांना माहिती लपविल्याबद्दल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपये दंड करुन याचिका निकाली काढत सर्व मागण्या फेटाळून संबंधित केस ‘डिसमिस’ केली असल्याचे चेअरमन डॉ.विनायकराव चव्हाण आणि सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी बुधवारी, २० मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दुय्यम चिटणीस रावसाहेब साळुंखे, संचालक भैय्यासाहेब पाटील, ॲड.साहेबराव पाटील यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक संस्थेत जानेवारी २०२३ मध्ये निवडणुकीत नवीन पॅनल सत्तेवर येऊनही डॉ.संजय देशमुख…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या यात्रोत्सवात महिलांच्या मंगलपोत आणि मोटरसायकली चोरणाऱ्या चोरट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. दरम्यान, दोन्ही गुन्ह्यातील चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात दोन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, मुक्ताईनगर शहरात गेल्या ७ मार्च रोजी नवीन मुक्ताबाई मंदिर व मुक्ताबाई जुने मंदिर कोथळी येथे आदिशक्ती मुक्ताबाई यात्रोत्सव आणि महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी जमणार होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हे महिलांच्या गळ्यातील मंगलपोत, पाकीट व मोबाईल चोरी तसेच मोटार सायकलींची चोरी करतात. अशा चोरीच्या घटना घडू नये, यासाठी चोरट्यांना प्रतिबंध…

Read More

साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीच्यासमोर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या बाजुलाच हजारो भक्तांचे श्रद्धास्थान श्रीरामाचे मंदिर आहे. तसेच सरकारी दवाखाना, वाचनालय, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक संघ केंद्र, कन्या शाळा आहे. मात्र, घाणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. नालेसफाई वेळेवर होत नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार नागरिकांच्या सुरक्षितेसाठी स्वच्छ भारत मिशन मोहीम राबवित आहे. मात्र, ग्रामीण भागाकडे स्वच्छ भारत मिशन मोहीम केवळ नावापुरतेच राहिलेली आहे, अशी समज नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. यापूर्वी श्रीराम मंदिर रामप्रतिष्ठेवेळी संपूर्ण परिसर गावातील तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छ केला होता. परंतु त्या परिसरातील रहिवाशी पुन्हा…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ महानाट्याचे आयोजन केले होते. त्यात तब्बल १७५ कलाकारांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सव्वा तासभर चाललेल्या यशस्वी महानाट्यात रसिकांची मने जिंकून घेतली. नाटिका संपन्न झाल्यावर संपूर्ण प्रसारमाध्यम, युट्युब, व्हॉट्सॲप, फेसबुक यावर प्रसारण झाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव झाला. भविष्यात असे नाटक पाचोऱ्याच्या इतिहासात रचले गेले त्याचा सार्थ अभिमान पाचोराकरांना झाला. याबद्दल संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. महानाट्यासाठी ज्यांची मूळ संकल्पना होती ते संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी मनोगतात पालक व विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेली कला…

Read More