एम.एम.महाविद्यालयात डॉ. अतुल सूर्यवंशी यांचे व्याख्यानाद्वारे युवतींना कौशल्यावर धडे

0
2

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेतर्फे आयोजित आत्मनिर्भर युवती अभियाना अंतर्गत बुधवारी, २० मार्च रोजी डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी ‘महिलांमधील नेतृत्व गुण व विविध कला गुण सॉफ्ट स्किल’ विषयावर व्याख्यानाद्वारे कौशल्याविषयी युवतींना धडे दिले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील होते.

व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.डॉ. जी. व्ही .पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एस. इंगळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.वाय .बी.पुरी, प्रा. स्वप्निल भोसले, सरोज अग्रवाल, प्रा. आर.बी. वळवी, प्रा. अमित गायकवाड तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

महिलांनी स्वतःला ओळखून आपल्या क्षमता विकसित कराव्यात.त्या क्षमतांच्या आधाराने महिलांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात आपले नावलौकिक कमवावे, असे आवाहन डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शारदा शिरोळे तर आभार डॉ.सीमा सैंदाणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here