साईमत, यावल : प्रतिनिधी यावल-चितोडा रस्त्यावर चितोडा गावाकडे जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीचे सुसाट वेगात धावणारे डंपर उलटल्याची घटना रविवारी, ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नसली तरी घटनास्थळी डंपरचे दोन तुकडे झाले होते. अवैध वाळू वाहतुकीचे डंपर उलटल्याचे वृत्त यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश यावल पोलिसांसह महसूल विभागाला दिले. अवैध वाळू डंपरची घटना घडता बरोबर यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पुढील कारवाई केल्यामुळे यावल महसूलच्या तिजोरीत मोठी आर्थिक भर आर्थिक वर्ष अखेर पडली. जिवीतहानी झाली नसली तरी डंपर मालकाचे मोठे आर्थिक…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने रात्रीच्या सुमारास नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना तीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह अंदाजे साडेचार लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडला आहे. त्यात एका आरोपीला ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार झाले आहे. सविस्तर असे की, मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्यावतीने धरणगाव ते मलकापूर तहसील चौकात नाकाबंदी तसेच कॉम्बिंग ऑपरेशन राबवित असताना मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सापळा रचत क्र.एमएच ४३ एएफ ६५६२ हे वाहन पकडले. या वाहनाची झडती घेतल्यावर त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा आढळून आला. याप्रकरणी…
साईमत, सावदा, ता.रावेर ः वार्ताहर सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे एक कि.मी.च्या अंतरावर कोचुर रस्त्यावरील रस्त्यालगत असलेले लोकेश सुभाष बेंडाळे रा.सावदा यांचे शेत गट नं.६५६ येथील बांधलेल्या खोली क्रं.२ मध्ये एका पुरुषाची दगडाने ठेचून हत्त्या झाल्याने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील सावदा येथे कोचुर रस्त्यावर असलेल्या लोकेश सुभाष बेंडाळे यांच्या शेतात रखवालदार असलेल्या शोभाराम रीचू बारेला उर्फ सुरमा भोपाली (वय ४४, मूळ रा. मध्यप्रदेश) याचा शेतात बांधलेल्या खोलीत रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने तोंडावर डांबर खडीच्या पया दगडाने ठेचून हत्या केली. तसेच त्याच्या छातीवर भलामोठा दगडही ठेवला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी येथील न.ह रांका हायस्कुलमध्ये जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनाअंतर्गत बोदवड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष एच.जी.इंगळे होते. याप्रसंगी जळगाव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष तथा जिल्हा सचिव एस.डी.भिरूड, कला अध्यापक संघाचे जिल्हा सचिव अरुण सपकाळे, जिल्हा निरीक्षक एस.के.पाटील, शारीरिक शिक्षक महासंघ राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव डॉ.प्रदीप साखरे, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक डॉ.संजय निकम, भुसावळ पतपेढीचे संचालक ज्ञानेश्वर मोझे, अमित परखड, रां.का.हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एन. ए.पाटील, माजी पर्यवेक्षक बी.यु.पानपाटील, पर्यवेक्षक आर.के.तायडे आदी उपस्थित होते. जाहीर केलेल्या नूतन कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी जी.बी.भोई (न.ह.रांका हायस्कुल, बोदवड), उपाध्यक्ष मुकेश बरडे (चि.स.महाजन हायस्कुल, जामठी), महिला उपाध्यक्ष…
साईमत, रावेर : प्रतिनिधी अहिरवाडी वनक्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल पकडली आहे. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी वन विभागाने डिंकासह २७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर असे की, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर (प्रा) यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार रावेर वनक्षेत्रातील परिमंडळ अहिरवाडीमधील नियतक्षेत्र पडल्यामधील कं.नं.०३ मध्ये गस्त करीत असताना एक मोटार सायकल (क्र.एम.पी.१२ बीए ७२०२) सी.टी.१०० कंपनीची ही अवैध सलई डिंक वाहतूक करतांना मिळून आली त्यात साधारण विस किलो सलई डिंक जप्त केला आहे. आरोपी सलई डिंक व मोटार सायकल फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. आरोपीचा पाठलाग केल्यावर आरोपी मिळून आला…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील जे.ई.स्कुलमध्ये मुक्ताईनगर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी संजय रघुनाथ ठाकूर (जे.ई.स्कूल मुक्ताईनगर), उपाध्यक्षपदी विलास दिनकर तायडे (एस. एम. नारखेडे विद्यालय, रुईखेडा), महिला उपाध्यक्ष स्वाती उदय चौधरी (एस.बी. हायस्कुल, चांगदेव), सचिवपदी सुनील राजाराम मोरस्कर (नवीन माध्यमिक विद्यालय, हरताळा), संघटक सचिव निलेश शालिग्राम पाटील (आर .जी. डी. विद्यालय, कर्की), क्रीडा चिटणीस संजीव मोतीलाल वाढे (जे.ई. स्कुल, मुक्ताईनगर), कोषाध्यक्षपदी चंद्रमणी दामू इंगळे (मी.फ.तराळ विद्यालय, अंतुर्ली) उर्वरित सदस्य म्हणून आदींची निवड करण्यात आली. निवडीसाठी निरीक्षक म्हणून जे.के.पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ), एस.डी.भिरूड (अध्यक्ष, जळगाव शिक्षक पतपेढी), अरुण सपकाळे (सचिव, कला…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी वीज महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी महिलांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महावितरणच्या खासगी एजंटांची दादागिरी कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे? सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य जनतेकडे कमी रकमा असून एकीकडे लाखो रुपयांचे वीज देयके थकीत असताना त्यांचा वीज पुरवठा नियमित सुरू राहतो. हजारो रुपयांचा विद्युत प्रलंबित असताना सर्वसामान्य जनतेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो, हे एक न उलगडणारे कोडे आहे. होणाऱ्या भ्रष्टाचाराला वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांची मूकसंमती तर नाही ना? अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय? खासगी कर्मचाऱ्यांच्या दादागिरीवर अंकुश ठेवतील का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर ‘वेळेवर लग्न लावा आणि पाच हजार रुपये मिळवा’, असा स्तुत्य उपक्रम मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी जामनेर तालुक्यासाठी सुरु केला आहे. अशा स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एक लाखाचा बँड, वीस हजाराची बग्गी लावलेली आहे. परंतु तुमच्यामुळे दोन हजार लोकांना आपण चार ते पाच तास उन्हात ताटकळत ठेवणे किती योग्य आहे. इतर समाजाचा आदर्श मराठा समाजाने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ही बक्षीस योजना सुरु करीत असल्याचे आबासाहेब पाटील यांनी सांगितले. पहिल्या बक्षीसाचे मानकरी सोनाळा येथील नवदाम्पत्य ठरले. यावेळी वधू-वर, आई-वडील यांचा जाहीर सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.मनोहर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी केळी पिक विमा योजनेतील ५३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती खा. उन्मेष पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमाबाबत सतत पाठपुरावा करत आहे. ह्या माध्यमातून जिल्ह्यातील ९ हजार ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची (ज्या शेतकऱ्यांचे प्रस्तावना ॲप्रोवल मिळून नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते) नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अंदाजित ५३ कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ हजार ३०० शेतकरी (ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्राची तफावत होती) अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव व तसेच जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले ६ हजार…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी येथे शिवसेना भुसावळ तालुका विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. बैठकीत शिवसेनेच्या (उबाठा) अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. तसेच आगामी काळात भुसावळला तालुक्याचा भव्य असा शिवसेनेचा मेळावा घेण्याचे सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले. मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बोलाविण्याचे ठरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन होते. यावेळी नवनियुक्त विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख विकास पाटील, उप जिल्हा संघटक निलेश सुरडकर, भुसावळ शहरप्रमुख पवन नाले यांचा जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सत्कार केला. याप्रसंगी संघटनेच्या कामकाजाविषयी आढावा घेण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक तसेच पदाधिकारी, शिवसैनिकांशी चर्चा विनिमय करून लवकरात लवकर संघटनेची बांधणी…