मुक्ताईनगर माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संजय ठाकूर

0
44

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

येथील जे.ई.स्कुलमध्ये मुक्ताईनगर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी संजय रघुनाथ ठाकूर (जे.ई.स्कूल मुक्ताईनगर), उपाध्यक्षपदी विलास दिनकर तायडे (एस. एम. नारखेडे विद्यालय, रुईखेडा), महिला उपाध्यक्ष स्वाती उदय चौधरी (एस.बी. हायस्कुल, चांगदेव), सचिवपदी सुनील राजाराम मोरस्कर (नवीन माध्यमिक विद्यालय, हरताळा), संघटक सचिव निलेश शालिग्राम पाटील (आर .जी. डी. विद्यालय, कर्की), क्रीडा चिटणीस संजीव मोतीलाल वाढे (जे.ई. स्कुल, मुक्ताईनगर), कोषाध्यक्षपदी चंद्रमणी दामू इंगळे (मी.फ.तराळ विद्यालय, अंतुर्ली) उर्वरित सदस्य म्हणून आदींची निवड करण्यात आली.

निवडीसाठी निरीक्षक म्हणून जे.के.पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ), एस.डी.भिरूड (अध्यक्ष, जळगाव शिक्षक पतपेढी), अरुण सपकाळे (सचिव, कला अध्यापक संघ), ललित चौधरी (जिल्हा उपाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) आदी होते.

याप्रसंगी जे.ई.स्कुलचे मुख्याध्यापक आर.पी.पाटील, चांगदेव हायस्कुलचे मुख्याध्यापक विजय चौधरी, घोडसगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक मिलिंद संग्रामपूरकर, एन. पी. भोंबे, जळगाव पतपेढीचे संचालक एस.डी. सांगळकर, भुसावळ पतपेढीचे संचालक डी.जे. गुळवे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. बी .वंजारी तर आभार डी.जे. गुळवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here