Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अहिरवाडी वनक्षेत्रात सलई डिंक पकडला
    क्राईम

    अहिरवाडी वनक्षेत्रात सलई डिंक पकडला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, रावेर : प्रतिनिधी

    अहिरवाडी वनक्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल पकडली आहे. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी वन विभागाने डिंकासह २७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    सविस्तर असे की, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर (प्रा) यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार रावेर वनक्षेत्रातील परिमंडळ अहिरवाडीमधील नियतक्षेत्र पडल्यामधील कं.नं.०३ मध्ये गस्त करीत असताना एक मोटार सायकल (क्र.एम.पी.१२ बीए ७२०२) सी.टी.१०० कंपनीची ही अवैध सलई डिंक वाहतूक करतांना मिळून आली त्यात साधारण विस किलो सलई डिंक जप्त केला आहे. आरोपी सलई डिंक व मोटार सायकल फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. आरोपीचा पाठलाग केल्यावर आरोपी मिळून आला नाही. वन गुन्हा हा वनरक्षक पाडले खु.यांच्या प्र.रि.क्रं ०१/२०२४ २९ नोंदविला आहे.

    सापडलेला सलई डिंक २० किलो आहे. डिंकाची किंमत २ हजार २०० रुपये इतकी आहे. तसेच मोटारसायकलची बाजारभाव अंदाजित रक्कम २५ हजार रुपये इतकी आहे. अशी सर्व मिळून २७ हजार २०० इतकी आहे.

    कारवाईत अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनरक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक रमेश भुतेकर यांचा सहभाग होता. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वनपाल अहिरवाडी यांच्यामार्फत सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Raver:नवजात बाळ मृत्यू प्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला सेवेतून कमी

    March 12, 2026

    Muktainagar: हरताळा फाट्यानजीक भीषण अपघात राँग साइडने धावलेल्या कारने पाच मजुरांना उडविले

    March 12, 2026

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.