शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

केळी पिक विमा योजनेतील ५३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती खा. उन्मेष पाटील यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमाबाबत सतत पाठपुरावा करत आहे. ह्या माध्यमातून जिल्ह्यातील ९ हजार ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची (ज्या शेतकऱ्यांचे प्रस्तावना ॲप्रोवल मिळून नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते) नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अंदाजित ५३ कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ११ हजार ३०० शेतकरी (ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्राची तफावत होती) अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव व तसेच जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले ६ हजार ६८६ (ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले होते) असे सर्व कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कारवाईसाठी सादर केलेले आहेत. प्रलंबित असलेले ११ हजार ३०० (किती वाजता क्षेत्रामधील तफावतमुळे रखडलेले) + ६ हजार ६८६ (जिल्हास्तरीय समितीने मंजूर करून कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कार्यासाठी पाठवलेले) प्रस्तावनाबाबत पाठपुरावा करत आहे. लवकरच प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही खा. उन्मेष पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here