मुद्देमालासह साडे सात लाखांचा गुटखा पकडला

0
3

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने रात्रीच्या सुमारास नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना तीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह अंदाजे साडेचार लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडला आहे. त्यात एका आरोपीला ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार झाले आहे.

सविस्तर असे की, मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्यावतीने धरणगाव ते मलकापूर तहसील चौकात नाकाबंदी तसेच कॉम्बिंग ऑपरेशन राबवित असताना मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सापळा रचत क्र.एमएच ४३ एएफ ६५६२ हे वाहन पकडले. या वाहनाची झडती घेतल्यावर त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा आढळून आला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी चालक शेख यासीन शेख रहमान (वय ४४, रा.मोमीनपुरा, परपेट, मलकापूर) याला ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोन आरोपी साजिद खान चांद खान (कॅप्टन) आणि इरफान खान रहमान खान उर्फ बाबू खान (रा.परपेट, मलकापूर) हे फरार झाले आहे.

याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. ही कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here