साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागविण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथील जीपीएस ग्रुपमार्फत ५०० बडगे (मातीची भांडी) वाटप करण्यात आले. केवळ साहित्य लावले नाही तर त्यामध्ये महिनाभर पाणी व धान्य ठेवण्याची जबाबदारीही तरुणाईने समर्थपणे उचलून पक्ष्यांचे प्राण वाचवावे व पक्ष्यांसाठीच्या जाणिवेचा हा ओलावा आणखी वाढविण्यासाठी सर्वांकडूनच बळ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रतापराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी बाजाराचे औचित्य साधून ५०० बडगे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, रावेर : प्रतिनिधी आगामी ईद आणि येणारे सण सर्व धर्मीय लोकांनी शांततेत साजरे करावे. समाजात शांतता भंग करणाऱ्यांची नावे पोलीस प्रशासनाला कळवावे. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असे कोणतेही काम कोणीही करू नये, असे अवाहन आयपीएस तथा पोलीस उप विभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी केले. रावेर पोलीस स्टेशनतर्फे आयोजित सामाजिक एकता सर्वधर्म समभाव इफ्तार पार्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मौलाना गयासुद्दीन, मौलाना नजर यांनी रमजान महिन्याबद्दल माहिती दिली. आगामी ईद व सण दरम्यान आयोजित मिरवणुकीवर वायफळ खर्च करण्यापेक्षा गरजु विद्यार्थ्यांना पुस्तके घेऊन द्यावे, समाजोपयोगी विधायक कामे करण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.प्रदीप जयस्वाल यांनी आवाहन केले. इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे…
साईमत, यावल : प्रतिनिधी बांधकाम उद्योग १२ महिने सुरू राहत असल्यामुळे वाळूला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. वाळू कोण कुठून आणि कशी कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वाहनातून वाहतूक करेल हे आज सांगणे, अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे महसूल विभागासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्याच आव्हानातून गुरुवारी, ४ एप्रिल रोजी मध्यरात्री नंदुरबारकडून भुसावळकडे जाणारा साडेसहा ब्रास अवैध वाळू वाहतुकीचा ट्राला किनगावजवळ साकळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केला आहे. सविस्तर असे की, यावल तालुक्यात अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री १२ ते १२:३० वाजेच्या सुमारास किनगावजवळ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिजकर्म शाखा यांनी नंदुरबार येथून भुसावळ…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फे पहुर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक तथा माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, संस्थेचे चेअरमन बाबुराव पांढरे, संस्थेचे संचालक प्रल्हाद वानखेडे, प्रकाश लोढा, योगेश बनकर, विकास लोढा, भरत सोनार, राजूभाई जेंटलमेन, अहमद तडवी, कैलास पाटील, शेंदुर्णी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे माजी चेअरमन शाम सावळे, राजू पाटील, कैलास देशमुख यांच्यासह सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ. यश प्रफुल्लकुमार लोढा (एमबीबीएस), ईशा हिरालाल बारी(इलेक्ट्रॉनिक्स) क्षेत्रात जपान येथे ट्रेनिंगसाठी, लवकेश अशोक लहासे (तलाठी) म्हणून निवड, शिवाजी एकनाथ घोलप (तलाठी) म्हणून निवड, डॉ. स्नेहल शामराव…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील थेरोळा आणि धामणगाव येथे स्वीप अंतर्गत शिक्षण विभागामार्फत नुकतीच मतदार जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका गटशिक्षणाधिकारी मदन मोरे, केंद्रप्रमुख एस.डी.तायडे तसेच थेरोळा मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा जाधव, सरपंच पांडुरंग तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे सतीश कांडेलकर, भास्कर सोनवणे सोबतच ग्रामपंचायत सदस्य वैशाली कोळी, आशा वर्कर पुष्पा खांजोळे, अंगणवाडी सेविका रेखा भोंबे तसेच स्वीप समिती सदस्य राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. याठिकाणी १२ डी अंतर्गत ज्येष्ठ नागरिक असलेल्या ९३ वर्षीय बेलाबाई वामन मोरे यांची त्यांच्या घरी जाऊन गटशिक्षणाधिकारी मोरे तसेच केंद्रप्रमुख तायडे यांनी भेट घेतली. यावेळी धामणगाव येथे मुख्याध्यापक भूषण बच्छाव, ऐफाज बेग, रतिलाल राठोड, कल्पेश…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी येथील न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरत्या लोक अदालतीचे आयोजन केले होते. याप्रसंगी जलद न्यायासाठीच लोकअदालतीचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड.अर्जुन टी. पाटील यांनी केले. बोदवड येथील न्यायालयात फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी न्या. क्यू.ए.एन. सरवरी होते. फिरत्या मोबाईल व्हॅन लोकअदालतीत ५० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. मोबाईल व्हॅनद्वारा दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. व्यासपीठावर बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष व पंच म्हणून ॲड. अर्जुन टी. पाटील, ॲड. के. एस. इंगळे उपस्थित होते. फिरत्या मोबाईल व्हॅन…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत १० चोपडा (अ.ज.) मतदारसंघामधील विभाग सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांचे निवडणूक प्रशिक्षण व ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण चोपडा नगरपरिषद सभागृहात नुकतेच पार पडले. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गजेंद्र पाटोळे यांनी निवडणुकीबाबत सविस्तर प्रशिक्षण माहिती पीपीटीच्या मदतीने सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांना निवडणूक प्रक्रियेविषयी सविस्तरपणे सांगितली. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जाणीव वा जागृती करण्यात यावी. तसेच निवडणुकीमध्ये निर्बंध कुठे लागू आहे, याबाबत…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. ते श्रीक्षेत्र गजानन महाराज संस्थान, शेगाव पायी दिंडी सोहळा उत्साहाने पार पडत असतो. यंदा पायी दिंडी सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. श्रीहरींच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने आणि नांद्रा प्र.लो., रोटवद, नाचणखेडा, पाळधी वारकऱ्यांच्या आणि भजनी मंडळाच्या सहकार्याने श्री गजानन महाराज मंदिर, नांद्रा यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीला प्रारंभ झाला असून भाविक भक्त भक्तिरसाचा आनंद लुटत आहे. ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात भाविक तल्लीन झाले आहेत. दिंडीला बुधवारी, ३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर नांद्रा प्र.लो. येथून प्रारंभ झाला. पुढे नाचणखेडा, पाळधी, सोनाळा, मुळगाव, शहापूर, शेंगोळा,…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर जामनेर तालुक्यातील एका गावातील वीस वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे एका संशयिताने आर्मीचा अधिकारी असल्याचे सांगत ‘आमच्या मर्जीने वागली नाही तर बंदुकीने मारीन’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात वीस वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेते. तरुणीच्या तक्रारीनुसार संशयित मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी (वय ३०) याने फिर्यादीचे फोटो काढले. मी सांगेल तसे करत जा, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करेल, असे सांगितले.संशयित राहुल…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपाच्या तंबूत घबराट उडाली आहे. त्याबरोबरच जळगाव लोकसभेचे समीकरण झपाट्याने बदलण्याची चिन्हे दिसू लागल्याने खा.उन्मेष पाटलांचे बंडाला कसे सामोरे जायचे याबाबत भाजपाच्या श्रेष्ठींमध्ये मंथन सुरु झाल्याचे वृत्त आहे. भाजपाच्या गोटात यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाने उमेदवार बदलविला नाहीतर जळगाव लोकसभा मतदार संघात धक्का बसू शकतो, असा सूर पुढे येत आहे. त्यामुळे गुरुवारी ना.गिरीश महाजन यांनी माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यात बंदद्वार चर्चा झाल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे. यावेळी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून माजी आमदार स्मिता वाघ यांना…