क्षेत्रीय, नोडल अधिकाऱ्यांनी घेतले ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत १० चोपडा (अ.ज.) मतदारसंघामधील विभाग सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांचे निवडणूक प्रशिक्षण व ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण चोपडा नगरपरिषद सभागृहात नुकतेच पार पडले.

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गजेंद्र पाटोळे यांनी निवडणुकीबाबत सविस्तर प्रशिक्षण माहिती पीपीटीच्या मदतीने सेक्टर अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांना निवडणूक प्रक्रियेविषयी सविस्तरपणे सांगितली. तसेच उपस्थितांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जाणीव वा जागृती करण्यात यावी. तसेच निवडणुकीमध्ये निर्बंध कुठे लागू आहे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सेक्टर अधिकारी व नोडल अधिकारी यांच्या जबाबदारींचे अवलोकन करण्यात आले.

कर्मचाऱ्यांसाठी रविवारी पहिले प्रशिक्षण

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ईव्हीएम मशीन जोडणी सर्व कर्मचाऱ्यांनी शिकून घ्यावी, याबाबत सर्वांना सुचित केले. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी, ७ एप्रिल रोजी आयोजित केले आहे. प्रशिक्षणापूर्वी आणि प्रशिक्षणानंतर अधिक माहितीसाठी सर्वांनी माहिती पुस्तिकेचे वाचन करावे, असेही आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here