जामनेर तालुक्यातील तरूणीवर अत्याचार

0
15

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

जामनेर तालुक्यातील एका गावातील वीस वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानंतर तिचे अश्‍लील छायाचित्र आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे एका संशयिताने आर्मीचा अधिकारी असल्याचे सांगत ‘आमच्या मर्जीने वागली नाही तर बंदुकीने मारीन’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात वीस वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेते. तरुणीच्या तक्रारीनुसार संशयित मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी (वय ३०) याने फिर्यादीचे फोटो काढले. मी सांगेल तसे करत जा, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करेल, असे सांगितले.संशयित राहुल सुनील चौधरी (वय २८), सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण (वय २८, दोघे रा. शेंदुर्णी) यांनी तरुणीने वाहनात न बसल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच एका चार चाकी वाहनातून पीडितेला बुऱ्हाणपुरला नेले.

यावेळी प्रवासात तीन वेळा तरुणी सोबत अत्याचार केला. तेथून पीडितेला इंदोर व ग्वाल्हेरला नेले. तसेच बीएसएफमधील गणेश संजय सोनवणे टेकनपूर, मध्यप्रदेश यांनी आर्मीचा मोठा अधिकारी असल्याचे भासत आमच्या मर्जीने न वागल्यास बंदुकीच्या गोळ्या घालील. मला सर्व गुन्हे माफ आहेत, असे सांगत तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौघां विरोधात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here