थेरोळा, धामणगावला स्वीप अंतर्गत शिक्षण विभागातर्फे मतदार जनजागृती

0
2

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील थेरोळा आणि धामणगाव येथे स्वीप अंतर्गत शिक्षण विभागामार्फत नुकतीच मतदार जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका गटशिक्षणाधिकारी मदन मोरे, केंद्रप्रमुख एस.डी.तायडे तसेच थेरोळा मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा जाधव, सरपंच पांडुरंग तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे सतीश कांडेलकर, भास्कर सोनवणे सोबतच ग्रामपंचायत सदस्य वैशाली कोळी, आशा वर्कर पुष्पा खांजोळे, अंगणवाडी सेविका रेखा भोंबे तसेच स्वीप समिती सदस्य राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.

याठिकाणी १२ डी अंतर्गत ज्येष्ठ नागरिक असलेल्या ९३ वर्षीय बेलाबाई वामन मोरे यांची त्यांच्या घरी जाऊन गटशिक्षणाधिकारी मोरे तसेच केंद्रप्रमुख तायडे यांनी भेट घेतली. यावेळी धामणगाव येथे मुख्याध्यापक भूषण बच्छाव, ऐफाज बेग, रतिलाल राठोड, कल्पेश चौधरी, पोलीस पाटील मोरे उपस्थित होते. याप्रसंगी मतदानविषयक महत्त्व आणि माहिती नागरिकांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here