Author: Sharad Bhalerao

साईमत, रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सहस्त्रलिंग येथील एका शेतातून सहा लाख २१ हजाराचा सुमारे ९१ किलो गांजा रावेर पोलिसांनी पकडून जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामुळे रावेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना बुधवारी, १० रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन लालमाती ते सहस्त्रलिंग शिवारातील शेतात गांज्याच्या झाडाची लागवड केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, स.पो.नि. आशिष अडसुळ, पो.उप.नि. सचिन नवले, पो.हे.कॉ. ईश्‍वर चव्हाण, पो.ना.…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी केलेल्या अविश्रांत प्रयत्नामुळे समाजावर ठसा उमटला आहे. त्यांचे जीवन चरित्र समाजासाठी दिशादर्शक, प्रेरणादायी व ऊर्जादायी आहे. महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक असल्याने प्रत्येकाने महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गुरुवारी, ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी एकीकडे कडक ऊन तापत असताना अंगाची लाहीलाही होत असताना मंगळवारी, ९ एप्रिल रोजी मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने बोदवड तालुक्यातील अनेक गावात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. तसेच शेतातील रब्बीचे पिके भुईसपाट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच बुधवारी, १० एप्रिल रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील वाकी, मुक्तळ, वराड, जलचक्र येथे भेट देऊन पडझड झालेल्या घरांची व शेत शिवाराची पाहणी करून तहसीलदार यांच्यासोबत संपर्क साधून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली. एकीकडे नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असताना शेतकरी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना अथवा दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे सारासार विचार करून आपला अमूल्य मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आर. डी. कोळी यांनी केले. कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल शाळेत मतदार जनजागृती अभियाननिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच घोषणाही देण्यात आल्या. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया सफळे, किशोर पाटील, अमोल चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्र जळगाव मदर ब्लड सेंटर असलेल्या आई हॉस्पिटल्स यशोदाई ब्लड स्टोरेज सेंटरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. सोहळ्याला एरंडोल, धरणगाव, कासोदा, पारोळा, भडगाव तालुक्यांमधील डॉक्टर्स, समाजसेवक, रक्तदान शिबिर आयोजक, मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक म्हणून एरंडोल तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा, पारोळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेश पवार, धरणगाव तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद डहाळे, डॉ.अरुण कुलकर्णी, एरंडोलचे तालुका पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला, सहप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ.…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर जातीय सलोखा अधिक बळकट करण्यासाठी आणि तो कायम नांदावा, या मुख्य उद्देशाने येथील पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे यांच्यावतीने पोलीस ठाण्याच्या आवारात गुढीपाडवा, रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित रोजा ‘इफ्तार पार्टी’त शहरासह परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधव संख्येने सहभागी झाले होते. इफ्तार पार्टीत एकत्रपणे पवित्र रमजानचा रोजा इफ्तार केला. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘अनेकता मे एकता यही भारत की विशेषता’ अशा ब्रिद वाक्याची खरोखरच अद्भुत व कौतुकास्पद अंमलबजावणी केली. प्रत्येक समाजाने आपापले धार्मिक व सामाजिक सण, उत्सव, कार्यक्रम कायद्याच्या चौकटीत राहून आनंदाने साजरे करावे, असे आव्हान अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. याप्रसंगी अप्पर पोलीस…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सामाजिक बांधिलकी जपण्याकरीता महामानवांच्या जयंतीनिमित्त डॉ.उमाकांत पाटील, डॉ.प्रशांत पाटील संचालक श्रीलिला हॉस्पिटल, जामनेर आणि इंडियन रेड क्रॉस संस्थेच्यावतीने नुकतेच महारक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थेच्या सभासदांनी तसेच रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून अनेक ज्ञात-अज्ञात रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधीलकी जोपासली. यावर्षी १८१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला. त्यात महिलांचेही योगदान कौतुकास्पद ठरले. शिबिराप्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन श्रीलीला हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्कृष्ट उपक्रमाचे कौतुक केले. सुरवातीला महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यांचे लाभले…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील स.नं.झवर विद्यालयातील १९७८-७९ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ४५ वर्षांनी स्नेह मेळावा नुकताच मोठ्या आनंदात पार पडला. मेळाव्यात माजी शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. काही विद्यार्थी तर बंगलोर, पुणे, नाशिक, बुऱ्हाणपूर येथून येऊन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिक्षक अशोक सोनवणे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत माजी शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, माजी विद्यार्थी तसेच परिवारातील स्वर्गीय व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्नेहमेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी प्रकाश फुलझाडे, मदन पाटील, गुलाब पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद केली. त्यानंतर गुरुजनांना कृतज्ञता सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील लोणी, मादणी, महुखेडा, गारखेडा या गावांसह अनेक गावांना अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या गावांना मंत्री ना. गिरीष महाजन यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी संबंधित विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तालुक्यातील लोणी येथील बहुतांश शेतकरी आणि शेतमजुरांचे घरावरील पत्रे उडाले आहे. काही शेतकऱ्यांच्या घरात ठेवलेला कापूस पत्रे उडाल्यामुळे भिजला आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोणी गावातील मोतीराम…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माणुसकी ग्रुप’तर्फे गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यंदा पाणपोईचे सातवे वर्ष आहे. यावेळी ‘माणुसकी ग्रुप’चे मार्गदर्शक, ज्येष्ठ नागरिक तथा विकासोचे सभासद प्रभाकर चौधरी (गुरुजी), सैनिक प्रसाद पवार यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षी ‘माणुसकी ग्रुप’ पाणपोईचे नियोजन करीत असतात. बाहेर गावातील महिला, लहान मुले, वृद्ध, नागरिक यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करत आपले कामे आटपून घराकडे निघतात. यावेळी प्रभाकर चौधरी, सैनिक प्रसाद पवार, गजानन क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. उपक्रमासाठी ‘माणुसकी ग्रुप’चे सर्व सदस्य मिळून पाणपोईची देखरेख करत असतात. पाणपोई सुरळीत सुरु…

Read More