लोहाऱ्यात गुढीपाडव्याच्यादिवशी ‘माणुसकी ग्रुप’तर्फे पाणपोईचे उद्घाटन

0
7

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माणुसकी ग्रुप’तर्फे गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यंदा पाणपोईचे सातवे वर्ष आहे. यावेळी ‘माणुसकी ग्रुप’चे मार्गदर्शक, ज्येष्ठ नागरिक तथा विकासोचे सभासद प्रभाकर चौधरी (गुरुजी), सैनिक प्रसाद पवार यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

दरवर्षी ‘माणुसकी ग्रुप’ पाणपोईचे नियोजन करीत असतात. बाहेर गावातील महिला, लहान मुले, वृद्ध, नागरिक यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करत आपले कामे आटपून घराकडे निघतात. यावेळी प्रभाकर चौधरी, सैनिक प्रसाद पवार, गजानन क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. उपक्रमासाठी ‘माणुसकी ग्रुप’चे सर्व सदस्य मिळून पाणपोईची देखरेख करत असतात. पाणपोई सुरळीत सुरु रहावी, यासाठी माणुसकी समूहाचे रामचंद्र भीवसने, सैनिक चंद्रकांत गीते, सैनिक नितीन क्षीरसागर, सैनिक संदीप बाविस्कर, सैनिक जगदीश तेली यांचे वेळोवेळी लक्ष असते.

यावेळी रमेश लिंगायत, अमोल पाटील, गोकुळ माळी, सचिन पाटील, सुभाष गीते, प्रणेष क्षीरसागर, विशाल शेळके, फ्रेंड टेलर, भरत धनगर, सैनिक प्रदीप पवार, कुलवंत शेळके, संदीप कुंभार, मोहन चौधरी, अंकुश चौधरी, भैय्या चौधरी, अजय भदाणे यांच्यासह ‘माणुसकी ग्रुप’चे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन क्षीरसागर तर आभार अमोल पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here