सहस्त्रलिंगला शेतातून ९१ किलो गांजा पकडला

0
1

साईमत, रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सहस्त्रलिंग येथील एका शेतातून सहा लाख २१ हजाराचा सुमारे ९१ किलो गांजा रावेर पोलिसांनी पकडून जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्‍वर रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामुळे रावेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना बुधवारी, १० रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन लालमाती ते सहस्त्रलिंग शिवारातील शेतात गांज्याच्या झाडाची लागवड केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, स.पो.नि. आशिष अडसुळ, पो.उप.नि. सचिन नवले, पो.हे.कॉ. ईश्‍वर चव्हाण, पो.ना. जगदीश पाटील, कल्पेश आमोदकर, पो.कॉ. मुकेश मेढे, महेश मोगरे, विकारोद्दीन शेख, प्रमोद सुभाष पाटील, समाधान ठाकुर, सचिन घुगे, सुकेश तडवी, संभाजी बिजागरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, फोटोग्राफर, वजन काट्याचे मालक अशा पथकाने सहस्त्रलिंग येथे जाऊन आरोपी अक्रम कासम तडवी आणि शाहरुख कासम तडवी (दोन्ही रा. सहस्त्रलींग ता. रावेर) यांच्या मालकीच्या शेतात गांज्याची लागवड आढळून आली.

कारवाईत गांज्या सदृष्य ९१ किलो ४०० ग्रॅम वजनाची झाडे जप्त केले आहे. त्यांची किंमत सहा लाख २१ हजार ५२० रुपये इतकी आहे. आरोपींच्या शेतात मुद्देमाल मिळून आल्याने पो.ना. जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पो.स्टे.ला दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आरोपी शाहरुख कासम तडवी यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन नवले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here