साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी केलेल्या अविश्रांत प्रयत्नामुळे समाजावर ठसा उमटला आहे. त्यांचे जीवन चरित्र समाजासाठी दिशादर्शक, प्रेरणादायी व ऊर्जादायी आहे. महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक असल्याने प्रत्येकाने महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गुरुवारी, ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून माल्यार्पण केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच विजयसिंग पाटील, ग्रा.पं. सदस्य गणेश माळी (माउली), उमेश पाटील, निसार देशमुख, रामचंद्र सोमाणी, पं.स.चे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, युवासेनेचे आबा माळी, अनिल माळी, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, नारायण कोळी, श्रीकृष्ण साळुंके, मच्छिंद्र साळुंके, किशोर पाटील, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक, गोकुळ पाटील, बंडूदादा नारखेडे, प्रेमराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील तर आभार ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक यांनी मानले.