साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मेहुणबारे फाट्याजवळ गुरुवारी, ११ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ लाख ३९ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा आणि ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी, १२ एप्रिल रोजी पहाटे मेहुणबारे पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे फाटा रस्त्यावरून ट्रकमधून बेकायदेशीररित्या गुटखा व सुगंधित पान मसालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवारी, ११ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता पथकाने मेहुणबारे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव/एरंडोल : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे अंगावर वीज पडून श्रीकांत भिका महाजन (वय ३२) हा युवा शेतकरी ठार झाला होता. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागदुली येथे जाऊन वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कै. श्रीकांत महाजन यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रांताधिकारी व तहसिलदारांना मदतीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मयताच्या परिवारास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी सभापती अनिल महाजन, माजी सदस्य नाना महाजन, सरपंच किशोर महाजन, माजी सरपंच अशोक पाटील, शाखा प्रमुख अजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील ईदगाहमध्ये ईदनिमित्त गुरुवारी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. नमाज पठण झाल्यानंतर लोहारा गावातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पोलीस कर्मचाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने यंदाही हिंदू-मुस्लिम ऐक्य जपत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. तसेच भाजपाच्यावतीने चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग एकता संघटनेच्यावतीने सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला तरुण तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. सर्व धर्मसमभाव जपत तसेच आचार संहितेचे पालन करत पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत कार्यक्रम शांततेत पार पडला. यावेळी लोहाराचे भाजपाचे उपसरपंच दीपक खरे, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, बुथ प्रमुख दीपक पवार,…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरातील विविध समस्यांचे तातडीने निवारण करावे, अशा आशयाचे निवेदन येथील धरणगाव विकास मंचच्यावतीने नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक पारधी यांना नुकतेच दिले आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा धरणगाव विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य धरणगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत. निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना मोकळा श्वास मिळेल, अशी व्यवस्था करावी. गावातील विविध भागातील हायमास्ट व स्ट्रीट लाइट सुरु करणे, गावातील गटारींची स्वच्छता नळाच्या पाण्याच्या नियोजनानुसार करावे, बालाजी मंदिर ते भोईवाडा रस्ता दुरुस्त करणे, बालाजी मंदिर जवळील झोपडपट्टी भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मैला गटारातून वाहतो, त्याचे…
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील ख्वाजा नगर भागातील आणि ॲंग्लो उर्दु हायस्कुलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थी शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा मित्रांसह गारबर्डी धरणावर फिरायला गेला होता. तेव्हा धरणात पाय घसरल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रमजान ईदच्या दिवशी गुरुवारी, ११ एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे त्याच्या परिवारासह ख्वाजा नगर परिसरात शोककळा पसरली आहे. ताबिश शेख याने रमजान महिन्याचे ३० रोजे पूर्ण केले होते. त्याने शहरातील दारुल उलूम गुलशने कादरी येथे पवित्र कुराणाचे तीसपैकी तेरा पारे पाठ केलेले होते. ११ एप्रिल रोजी रमजान ईदचा सर्वत्र उत्साह होता. सकाळी ईदगाहवर सामूहिक नमाज पठण केल्यानंतर तो आपल्या…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आज आपण शिक्षणाचे फळे चाखत आहे. त्यांना सावित्रीबाई फुले यांनी समर्थ साथ दिली आहे. त्यांच्यामुळे आज संपूर्ण भारतात महिलांना सन्मानाचे स्थान मिळाले. यामुळे महिला शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावर जाऊन विराजमान झाल्या आहेत. हे फक्त फुले दाम्पत्यांनी केलेल्या कार्यामुळेच आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ.प. शिवाली पाटील यांनी व्यक्त केले. त्या मलकापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. बहुजन उद्धारक सेवा समितीद्वारा येथील शहीद संजयसिंह राजपूत स्मारक परिसरात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समारोह सर्वसमावेशक पद्धतीने साजरा करण्यात आला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जागतिक स्तरावर २०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. जगात ५९ देशात निवडणुका होत आहेत. भारतातही यावर्षी सात टप्प्यात निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. अशातच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जागृत करून लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने मतदारांना जागृतीसाठी सायकल रॅली, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लोकगीत आदी उपक्रम उपक्रम राबविलेले आहेत. ‘मतदान करा, देश घडवा’ ही भूमिका घेऊन सहायक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांनी चाळीसगाव येथील ईदगाह मैदानावर मतदार जनजागृती प्रतिज्ञेचे वाचन केले. तसेच ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. येथील ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लिम बांधवांची नमाज पठण झाल्यानंतर जामा मशिदीचे इमाम हाफिज जुबेर यांनी मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत मुस्लिम बांधवाना मतदान…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील छत्रपती शिवाजीनगरमधील ईदगाहमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. नमाज पठण झाल्यानंतर पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ता, राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, युवा नेते नगरसेवक भूषण वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगरसेवक बंडू चौधरी, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे, रईस बागवान, दीपक माने, समाधान मुळे, हारूण देशमुख, आलम देशमुख, प्रवीण ब्राह्मणे, प्रा. सी.एन.चौधरी, पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पीएसआय योगेश गणगे,…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथे क्षत्रिय माळी समाज आणि महात्मा फुले जन्मोत्सव समितीच्या विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम महात्मा फुले मंगल कार्यालय येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पहूर गावातून जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा रथ, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत हर्षल सोनवणे, शिवाजी महाराज यांचे मावळे रोहीत क्षीरसागर, शिवा काळे, क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत शिवाजी जाधव, चंद्रभागाबाई जाधव तर संत शिरोमणी सावता महाराज यांच्या वेशभूषेत दीपक बनकर, चोपदार भीमराव जाधव यांनी वेशभुषा परिधान…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे केला होता. आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही येथूनच सुरुवात केली आहे. शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली आहे. ‘सोनाई फिल्म क्रिएशन’ निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केले आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स आहेत. डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. चित्रपटात मनोज जरांगे…