फुले दाम्पत्याने केलेल्या कार्यामुळे महिला उच्च पदावर विराजमान

0
14

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच आज आपण शिक्षणाचे फळे चाखत आहे. त्यांना सावित्रीबाई फुले यांनी समर्थ साथ दिली आहे. त्यांच्यामुळे आज संपूर्ण भारतात महिलांना सन्मानाचे स्थान मिळाले. यामुळे महिला शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावर जाऊन विराजमान झाल्या आहेत. हे फक्त फुले दाम्पत्यांनी केलेल्या कार्यामुळेच आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ.प. शिवाली पाटील यांनी व्यक्त केले. त्या मलकापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.

बहुजन उद्धारक सेवा समितीद्वारा येथील शहीद संजयसिंह राजपूत स्मारक परिसरात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समारोह सर्वसमावेशक पद्धतीने साजरा करण्यात आला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बहुजन उद्धारक सेवा समितीद्वारे रामकृष्ण चोपडे यांना समाजभूषण तर नागपूर उच्च न्यायालयाचे ॲड. मिरा क्षीरसागर आणि ॲड. प्रदीप क्षीरसागर यांना सत्यशोधक फुले दाम्पत्य सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. बहुजन उद्धारक सेवा समितीच्या महिला प्रतिनिधींनी ह.भ.प. शिवाली पाटील यांना सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा, जिजाऊंची प्रतिमा, शाल देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी विविध स्तरातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, राजकीय पुढारी तथा महिला, पुरुष उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बहुजन उध्दारक सेवा समितीचे संतोष बोंबटकर, प्रा.डॉ.नितीन भुजबळ, श्‍याम वानखेडे, संजय उमाळे, किशोर राऊत, मंगेश सातव, दीपक बावस्कर, अतुल सपकाळ, वैभव भोसले, निरज येवतकर, सुपेश बोंबटकर आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here