पाचोऱ्यात मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त दिल्या शुभेच्छा

0
19

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजीनगरमधील ईदगाहमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. नमाज पठण झाल्यानंतर पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ता, राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, युवा नेते नगरसेवक भूषण वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगरसेवक बंडू चौधरी, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे, रईस बागवान, दीपक माने, समाधान मुळे, हारूण देशमुख, आलम देशमुख, प्रवीण ब्राह्मणे, प्रा. सी.एन.चौधरी, पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पीएसआय योगेश गणगे, पीएसआय प्रकाश चव्हाण, पीएसआय परशुराम दळवी, सर्व पोलीस स्टॉप, होमगार्ड यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here