साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील ईदगाहमध्ये ईदनिमित्त गुरुवारी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. नमाज पठण झाल्यानंतर लोहारा गावातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पोलीस कर्मचाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने यंदाही हिंदू-मुस्लिम ऐक्य जपत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. तसेच भाजपाच्यावतीने चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग एकता संघटनेच्यावतीने सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला तरुण तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. सर्व धर्मसमभाव जपत तसेच आचार संहितेचे पालन करत पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत कार्यक्रम शांततेत पार पडला.
यावेळी लोहाराचे भाजपाचे उपसरपंच दीपक खरे, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, बुथ प्रमुख दीपक पवार, भारत कोळी, सुरेश पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कुलवंतराव शेळके, प्रणेश क्षीरसागर, सुरेश कोळी, अंकुश चौधरी, संदीप कुंभार, अजय भदाणे, भारत डामरे, लोटू काळदाते, भावडु श्रृंगारे, पंकज माळी, संजय लिंगायत, राहुल राजपूत, ईश्वर खरे, विशाल शेळके, अरुण निकुंभ, बापू देशमुख, यशवंत शेळके, गुणवंत सरोदे, राहुल क्षीरसागर, गोपाल शेळके, दीपक पाटील, आशिष गीते, प्रशांत लिंगायत, गफ्फार मिस्तरी, रज्जाक सांडू, कामा पहिलवान, आसिफ शेख, अली असगर, मेहराज खान, शोएब खान, शकील खान, दानिष कुरेशी, मुस्ताक खाटीक, इस्माईल शेख, उस्मान हुसेन, मोबिन बागवान, कलीम शेख, कासिम मौलाना, नदीम बागवान, रहिस पठाण, छोटे खान, शाहरुख मण्यार, राजू मण्यार, नजिम शहा, रहीस शेख, अजहर बिस्मिल्ला, डॉ.सागर गरुड मित्र मंडळ तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.