पहुरला जिवंत देखावे ठरले मिरवणुकीचे आकर्षण

0
1

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

येथे क्षत्रिय माळी समाज आणि महात्मा फुले जन्मोत्सव समितीच्या विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम महात्मा फुले मंगल कार्यालय येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

पहूर गावातून जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा रथ, अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत हर्षल सोनवणे, शिवाजी महाराज यांचे मावळे रोहीत क्षीरसागर, शिवा काळे, क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत शिवाजी जाधव, चंद्रभागाबाई जाधव तर संत शिरोमणी सावता महाराज यांच्या वेशभूषेत दीपक बनकर, चोपदार भीमराव जाधव यांनी वेशभुषा परिधान करून मिरवणुकीचे लक्ष वेधून घेतले.

महात्मा फुले यांची मिरवणूक महात्मा फुले मंगल कार्यालयातून सुरुवात करण्यात आली. लेले नगर, हनुमान मंदिर, आर.टी.लेले हायस्कुल, बसस्टँड, होळी चौक, गढी चौक, येथुन मिरवणूक काढण्यात आली. लहासे चौक येथे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मिरवणुकीला एकनाथ करवंदे, अक्षय जाधव, बापू बनकर यांनी आपली बैलगाडीचे तर हनुमान मंदिर ट्रस्ट लेले नगर यांच्याकडून रथ व किशोर जाधव यांच्याकडून घोडाचे सहकार्य मिळाले. बाबुराव क्षीरसागर यांच्याकडून पाणी व्यवस्था करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

यावेळी केंद्रीय माळी समाज सुधार मंडळ १६ गावचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, सचिव हरीभाऊ राऊत, सहसचिव दीपक जाधव, महात्मा फुले माळी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर करवंदे, सचिव विकास उबाळे, सदस्य डॉ.जितेंद्र घोगंडे, विष्णू घोंगडे, दत्तू जाधव, बाबुराव पवार, नाना चौथे, महात्मा फुले जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दुर्गादास जाधव, उपाध्यक्ष ईश्‍वर हिवाळे, सचिव तुषार बनकर, रोशन चौधरी, नितीन जाधव, जामनेर मार्केट कमिटीचे सचिव वासुदेव घोंगडे, सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजु जाधव, माजी उपसरपंच योगेश भंडागे, ग्रा.पं. सदस्य शिवाजी राऊत, विक्रम घोंगडे, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सचिव राजू जाधव, राजधर पांढरे, समाधान पाटील, गणेश भडांगे, अर्जुन सोनवणे, देवेंद्र घोंगडे, विजय बनकर, राहुल ढेगांळे, रुपेश बनकर, हर्षल घोंगडे, वैभव लहासे, डिगंबर चौधरी, सोपान लहासे, प्रकाश जाधव, अतुल लहासे, वासुदेव गायकवाड, अमोल चौधरी, संदीप क्षीरसागर, प्रदीप द्राक्षे, समाज पंच मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी क्रांतीसूर्य महात्मा फुले जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन हरीभाऊ राऊत तर आभार ज्ञानेश्‍वर करवंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here