साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच सावदा शहरातील महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, याकरिता आयोजित केलेल्या कार्यशाळेत शहरातील बचत गटातील महिलांचे प्रतिनिधी म्हणून बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांना आमंत्रित केले होते. कार्यशाळेत उपस्थित सर्व महिलांना मतदानबाबतची प्रतिज्ञा देण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेतर्फे १०० टक्के मतदान हे ध्येय लक्षात ठेऊन स्पर्धेचे आयोजन केले आहे. याप्रसंगी महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. तसेच बचत गटातील व कुटुंबातील ८५ टक्के सदस्यांनी मतदान केल्यास कास्य प्रमाणपत्र तसेच ८६ टक्के ते ९५ टक्के सदस्यांनी मतदान केल्यास त्यांना रजत प्रमाणपत्र तसेच ९६…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी खान्देशाची कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या धरणगावात चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त कुस्तीपटूंसाठी खुल्या कुस्ती स्पर्धेचे रविवारी, २८ एप्रिल रोजी सायं.५ वाजता, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजन केले आहे. मैदानावर कुस्तीचा थरार रंगणार असून विजयी मल्लांना लाखांवर रोख बक्षिसे दिली जाणार आहे. पुरूषांच्या खुल्या गटातील प्रथम विजेत्याला २ लाख ५१ हजाराचे तर दुसऱ्या खुल्या गटातील विजेत्यास ५१ हजारांचे बक्षीस आहे. स्पर्धेत महाराष्ट्रसह भारतातील विविध राज्यातील मल्लांचा मुकाबला होत आहे. खुल्या मैदानी काटा कुस्ती सामन्यात उपमहाराष्ट्र केसरी पुणे किरण भगत व पंजाब केसरी मुकेश कोहली यांच्यात २ लाख ५१ हजाराची जोड होणार आहे…
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर येथील माजी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, शेंदुर्णी जीन प्रेसचे माजी चेअरमन श्यामराव सावळे आदींनी जळगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी, २५ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री.लोढा यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थकांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षा खडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्री. लोढा यांच्या प्रवेशाने पहूरच्या राजकीय वर्तुळात भाजपचे पारडे जड झाले आहे.
साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव-छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच पाचोरा मार्गावरील रस्त्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे सध्या महामार्गावर धुळीचेच साम्राज्य पसरले आहे. या धुळीचा पादचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर धुळीचे लोट उठू लागल्याने नागरिकांनी ओरड केली आहे. पहूरवरून जामनेर, शेंदुर्णी येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता जात असतात. त्याचप्रमाणे पहूर हे एक मोठे बाजारपेठ आहे. १० ते १२ खेडे गावाला लागून आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. चौफुलीचे गाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची वर्दळ असते. अशातच पहूर येथे महामार्गावरील पूलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. उन्हाळ्याचे…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी शहरातील नीमवाडी चौकातून दोन मुख्य मार्ग जात आहे. रेल्वे स्टेशन रोड व सिनेमा रोडवर वाहतूक जास्त असल्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण काढून एकेरी मार्ग करण्यासाठी अनेक नागरिकांची मागणी आहे. याकडे न.प.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. निमवाडी चौकातून दोन मुख्य रोड अरुंद असल्यामुळे याठिकाणी बाजाराच्या दिवशी वाहन धारकांना आणि पुरुष व स्त्रिया यांना बाजारात ये-जा करणे जिकरीचे होत आहे. यामुळे स्त्रियांना धक्का लागून वाद घडलेले आहे. यामध्ये अनेकवेळा गटबाजीने भांडणही होताना निर्दशनास येत आहे. याशिवाय स्थानिक ठिकाणच्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या समोर अतिक्रमण वाढविल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झालेली आहे. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना रस्त्यावरून अवागमन करत असताना तारेवरची कसरत करावी…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या मतदारांसाठीच ‘होम वोटिंग’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अशा उमेदवारांची भेट घ्यावी. ‘होम वोटिंग’ करताना उमेदवाराच्या घरी स्वतंत्र मतदार कक्ष उभारावा. ‘होम वोटिंग’ करताना तेथे व्हिडिओ कॅमेरा नेऊन मतदान करतानाचे चित्रीकरण करावे. होम वोटिंगसाठी लवकरच गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यानुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी आयोजित आढावा बैठकीत उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नेरी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरातर्फे गुरुवारी, २५ एप्रिल रोजी हिवताप दिन मोहीम राबविण्यात आली. ‘गाव तिथे हिवताप दिन’ संकल्पना राबवून कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बाहेकर, जिल्हा हिवताप आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, आयुष्यमान आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच तालुका हिवताप सुपरवायझर प्रवीण दाभाडे यांच्या उपस्थितीत नेरी येथे जनता माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना हिवताप दिनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने दक्षता घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही, डास चावणार नाही, म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंताचा लढा सक्षमपणे शेवटपर्यंत लढून सर्व समाजातील शोषित पीडित अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यांना सन्मानाचे जीवन मिळून दिले तेच खरे जगातील सोशल इंजिनियर्स आहेत, असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांनी केले. सालाबादप्रमाणे यंदाही सूर्यपुत्र भैयासाहेब (यशवंत) भीमराव आंबेडकर बहुउद्देशिय क्रीडा व सांस्कृतिक संस्था व महाबोधी महिला मंडळ, वृंदावन नगर द्वारा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव स्थानिक धम्म ध्वजासमोरील पटांगणात साजरी करण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून वाकोडी ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम काजळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून…
साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी शहरात सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मोठा मारुती मंदिर, त्रिवेणी मंदिर, खंडोबा देवस्थान परिसरातील मारुती मंदिर, गणपती वाडीतील मारुती मंदिर, आठवडे बाजारातील श्रीराम पेठ, मारुती मंदिर, विद्यानगरातील मारुती मंदिरासह आदी ठिकाणी संपूर्ण मारुती मंदिर परिसरात विद्युत रोषणाईची सजावट केली होती. महाभिषेक, महाआरती, सुंदर कांड तर काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी असंख्य भाविकांनी जयघोष करीत दर्शनाचा लाभ घेतला. त्रिवेणी भागातील हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे बजरंग बलीच्या मिरवणूक प्रसंगी खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी पवनजी महाराज, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, युवा नेते धनंजय चौधरी, केतन किरंगे, पंडित कोल्हे, राजू…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी चाळीसबिघा परिसरातील डॉ.मनोज पाटील ते कोलते हॉस्पीटलपर्यंत नाली व रस्त्याचे काम मंजूर तसेच वर्कऑर्डर होऊनही संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट करीत गेल्या काही महिन्यांपासून ते बंद आहे. तेव्हा नाली व रस्त्याचे काम येत्या सात दिवसात सुरू करण्यात यावे, अन्यथा अधिकाऱ्यांना चपलांचा हार घालू व तोंडाला काळे फासू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी २३ एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील चाळीसबिघा परिसरात डॉ.मनोज पाटील ते कोलते हॉस्पीटलपर्यंत डांबरीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश १७ मे २०२३ रोजी संबंधित कंत्राटदारास न.प. प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने…