जातीअंताचा लढा म.फुले अन्‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत सक्षमपणे लढला

0
2

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंताचा लढा सक्षमपणे शेवटपर्यंत लढून सर्व समाजातील शोषित पीडित अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यांना सन्मानाचे जीवन मिळून दिले तेच खरे जगातील सोशल इंजिनियर्स आहेत, असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांनी केले. सालाबादप्रमाणे यंदाही सूर्यपुत्र भैयासाहेब (यशवंत) भीमराव आंबेडकर बहुउद्देशिय क्रीडा व सांस्कृतिक संस्था व महाबोधी महिला मंडळ, वृंदावन नगर द्वारा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव स्थानिक धम्म ध्वजासमोरील पटांगणात साजरी करण्यात आली.

यावेळी उद्घाटक म्हणून वाकोडी ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम काजळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून म्युनिसिपल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस डी. राठोड, समाजभूषण एल. सी. मोरे, डॉ. जी. ओ. जाधव, ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष ॲड. कुणालभाई वानखेडे, विजयकुमार तायडे, ज्येष्ठ पत्रकार उल्हासभाई शेगोकार, यशवंत गवई, जी. डी. झनके, करुणा मोरे, ॲड. स्नेहल तायडे, अरूणसिंह राजपूत, बौद्धाचार्य एस.एस.वले, के. यू. बावसकर, माजी सैनिक विजय मोरे, मनोहर नरवाडे, राजेश इंगळे, आर.एम. झनके, कृष्णा खराटे, भीमराव खराटे, भैय्या खराटे यांच्यासह बहुजन जनसमुदाय उपस्थित होता.

यानंतर दिलीप इंगळे प्रस्तुत ‘भीमा तुझ्या जन्मामुळे…’ भीम गीतांचा अतिशय मनोरंजक आणि प्रबोधन करून जाणारा कार्यक्रम सादर झाला. मराठी फेम गायक सागर झनके, स्नेहल वानखेडे आणि दिलीप इंगळे यांनी आपल्या मधुर आणि भारदस्त गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

यशस्वीतेसाठी एल.सी.मोरे, विपस्सी साधक के. यू.बावसकर, माजीसैनिक विजय मोरे, मनोहर नरवाडे, कृष्णा खराटे, सुभेदार झनके, विजय वाकोडे, श्री.धुंदले, भीमराव खराटे, प्रकाश नरवाडे, श्री.गुरचळ, प्राचार्य जे.आर.मोरे, सुरेश निकम, एस. बी.सावदेकर, बाळू सावळे, अतुल मोरे, प्रशांत लोखंडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रेखा मोरे, लिनाताई इंगळे, सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष छायाताई मोरे, पुष्पलता मोरे, ज्योती नरवाडे, सुशील नरवाडे, कुंदन खराटे, अश्‍विन मोरे, सागर गुरचळ, श्री.घोडेस्वार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री.सुरवाडे, विजय वाकोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here