साईमत, फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी
शहरात सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मोठा मारुती मंदिर, त्रिवेणी मंदिर, खंडोबा देवस्थान परिसरातील मारुती मंदिर, गणपती वाडीतील मारुती मंदिर, आठवडे बाजारातील श्रीराम पेठ, मारुती मंदिर, विद्यानगरातील मारुती मंदिरासह आदी ठिकाणी संपूर्ण मारुती मंदिर परिसरात विद्युत रोषणाईची सजावट केली होती. महाभिषेक, महाआरती, सुंदर कांड तर काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी असंख्य भाविकांनी जयघोष करीत दर्शनाचा लाभ घेतला.
त्रिवेणी भागातील हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे बजरंग बलीच्या मिरवणूक प्रसंगी खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी पवनजी महाराज, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, युवा नेते धनंजय चौधरी, केतन किरंगे, पंडित कोल्हे, राजू महाजन, पराग पाटील, मनोज चौधरी, चंदू कोळी, उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव वकारे, उपाध्यक्ष तुषार किरंगे, खजिनदार अक्षय सिंह परदेशी, सचिव दीपक कापले, सदस्य गणेश परदेशी, विनोद कपले, विक्की काकडे, अमोल वकारे, मनोज परदेशी, बापू सनन्से, भूषण कोळी, ललित परदेशी, चंदन कोळी, ऋषी वकारे, अजिंक्य भारंबे, करण परदेशी, लोकेश वाघ, दीपक कोळी, उदय पाटील, यश वाढे, प्रभू वर्मा, जयपाल सिंह वर्मा यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. तसेच मोठ्या मारोती मंदिरात नरेंद्र चौधरी, कल्पेश खत्री यांच्या हस्ते पूजन व महाआरती करण्यात आली. त्याचबरोबर शिवाजी राऊते, विनोद गलवाडे, कैलास चौधरी, धनु चौधरी, दिनू नारखेडे, रमेश गलवाडे, धोडू सोनवणे यासह जय बजरंग ग्रुप, धोबीवाडा या भाविकांच्या हस्तेही पूजन करून महाआरती करण्यात आली.
शहरातही भाविकांच्या हस्ते ठिकठिकाणी पूजन करून आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्रिवेणी चौकातून निघालेली बजरंग बलीची मिरवणूक मुख्य मार्गावरील सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड, रथ गल्ली, लक्कडपेठ मोठा मारुती मार्गे निघालेली होती. श्री महाबली मारुती दादा प्रतिष्ठान यावलतर्फे सजीव देखाव्यात बजरंग दादा सोबत वानर सेना अग्रभागी होते. दर्शन घेण्यासाठी दुतर्फा भाविक-भक्तगण सहभागी झाले होते. साईनाथ टेन्ट हाऊसचे गॅस फुगे, गोड व प्यारो मशीनने रंगीबेरंगी देखावे करण्यात आले होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ए.पी.आय. निलेश वाघ व त्यांचा पोलीस स्टॉप, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.