Author: Sharad Bhalerao

लासगावातील महिलांचा ‘उबाठा शिवसेना’ पक्षात प्रवेश साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : मला विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करून उध्दव ठाकरे यांनी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. त्यामुळे मतदारसंघातील महिला एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहत आहे. मतदारसंघात परिवर्तन होणारच, असे प्रतिपादन वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी केले. त्या लासगाव येथील प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील महिलांनी पक्षात प्रवेश घेतला. मी आपल्या कामांसाठी कटीबध्द आहे. आगामी निवडणुकीत भुलथापांना बळी न पडता ‘मशाल’ चिन्हाला मतदान करावे, असे आवाहन वैशालीताई यांनी केले. यांची होती उपस्थिती यावेळी उध्दव…

Read More

सिटी स्कॅन मशीनही आली, आ.लता सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चोपडा उपजिल्हा आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरणाचे आदेश जारी केले आहेत. त्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील आ.लता सोनवणे आणि माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी पाच वर्षांपासून पत्रव्यवहार करुन प्रदीर्घ प्रयत्न केले होते. त्यावर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे आदेश जारी करुन जमीन अधिकरण व बांधकामासह आवश्यक पदांची यादी लवकरच तयार करुन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठीही निधीची तरतूद केली आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघातील घोडगाव आणि विरवाडे गावातील प्राथमिक आरोग्य…

Read More

जामडीचे शेतकरी दीपक राजपूत यांच्या मेहनतीला २१००ची सलामी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो, मेहनत करतो आणि अन्नधान्य फळे भाजीपाला मेहनतीने पिकवितो. पण त्याला जर योग्य भाव मिळाला नाही तर तो माल कितीही उच्च प्रतीचा असला तरी मायबाप शेतकरी राजाला प्रचंड नुकसान सोसावे लागते. मात्र, त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि उत्तम प्रकारचा माल त्याने पिकविला. त्याला चांगला भाव मिळाला तर त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. जामडी येथील प्रयोगशील शेतकरी तथा सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक दीपक राजपूत यांनी मागीलवर्षी आपल्या दोन एकर क्षेत्रात तीन हजार केळीचे रोप लावले होते. त्यांची केळी ‘रशियाला’ निघाली असून त्यांच्या मेहनतीला २१०० ची सलामी मिळाली आहे.…

Read More

बहारदार शैलीत गायलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे श्रोते मंत्रमुग्ध साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी सुवर्णाताई स्मृती उद्यान येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत देशभक्तीभर गीतांचा कार्यक्रम सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी न.पा.चे उद्यान पर्यवेक्षक तथा वरिष्ठ लिपिक दीपक देशमुख होते. याप्रसंगी चाळीसगाव शहरातील नामवंत गायक रवी निकम, संगीत शिक्षक तुषार मुजुमदार, टीव्ही कलाकार गौरव काळगे, सुनील राजपूत, अशोक चौधरी, कु.रक्षंदा मोरे, कुसावनी मुजुमदार, कु.विधी निकम यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. याप्रसंगी विद्युत अभियंता कुणाल महाले, स्वच्छता निरीक्षक सचिन निकुंभ, चाळीसगाव जॉगिंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संखेने उपस्थिती दर्शविली. शहरातील संगीत रत्नांनी…

Read More

आ.मंगेश चव्हाण यांनी राबविला हिरापूर गावात पक्ष प्रवेशाचा ‘अनोखा पॅटर्न’ साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : राजकारण म्हटलं तर हेवेदावे गट-तट, रुसवा, दुरावा आलाच. त्यात भावकी-भावकीत गटागटात, जाती-जातीत भांडण लावून आपली पोळी बांधून घेणाऱ्या ‘बोलबच्चन’ लोकांची सध्या चलती आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात असे वातावरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीत एकमेकांविरुद्ध लढणारे मात्र गावाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. चाळीसगाव मतदार संघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मनोमिलनाचा ‘अनोखा पॅटर्न’ हिरापूर गावात राबविला आहे.हिरापूर येथे वर्षभरापूर्वीच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे असलेले दोन विरोधक यांना एकत्र आणण्याची किमया आ.मंगेश चव्हाण यांनी साधली आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तसेच…

Read More

उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान मानाचा ठसा ठरणार साईमत/रावेर/प्रतिनिधी: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांना २०२३-२४ आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ट तहसीलदार म्हणून स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा निवड समितीच्या अध्यक्षतेखाली उपक्रमात अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे आणि निवड समितीचे सदस्य, सचिव विजय सूर्यवंशी यांच्या समवेत तहसीलदार कापसे यांची निवड केली आहे. शेतकऱ्यांसाठी शेत-शिवार रस्ते मोकळे करणे आणि महसुली प्रकरणांचा मुदतीत निपटारा करणे अशा उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. अशा उल्लेखनीय कार्याबद्दल तहसीलदार बंडू कापसे यांना गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. जो त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा मानाचा ठसा ठरणार आहे. रावेर तालुक्याची धुरा १…

Read More

हौतात्म्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम साजरे साईमत/भुसावळ/प्रतिनिधी: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणारे भुसावळचे सुपुत्र शहीद नरेंद्र ओंकार महाजन यांच्या हौतात्म्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त सीआरपीएफ आणि त्यांच्या मित्रमंडळाच्यावतीने त्यांच्या स्मारकाला नुकतीच ‘मानवंदना’ देण्यात आली. हा कार्यक्रम भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी पुढाकार घेऊन पार पाडला. कार्यक्रमाला सीआरपीएफच्या पुणे येथील मुख्यालयातील एक खास पथक भुसावळात आले होते. त्यांच्या मानवंदनेसह कार्यक्रम उत्साहात पार पडला. भुसावळातल्या विद्यानगर भागातील रहिवासी नरेंद्र ओंकार पाटील हे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. ११ ऑगस्ट १९९९ रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ शहरातील रेडिओ केंद्राच्या संरक्षणात तैनात असतांना येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात प्रतिकार…

Read More

वर्षाकाठी मिळताहेत वीस लाखांचे उत्पन्न, शेतकरी देताहेत बागेला भेट साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील तळेगाव येथील शेतकरी रमेश सखाराम जिरी यांनी परिसरातील भरड जमिनीत नारळ शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवून ‘नारळाची’ शेती साकारली आहे. त्यातून त्यांना वर्षाकाठी वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक न घेता आता नवीन फळबाग किंवा पिकांकडे वळला पाहिजे, असे यावरुन स्पष्ट होत आहे. सव्वा दोन एकर म्हणजे ८९ आरमध्ये त्यांनी ४५० झाडे लावली आहे. एका झाडाला एका बहरला कमीत कमी २०० नारळे लागतात. असे सहा ते सात बहर वर्षभरात नारळाला येतात. कमीत कमी एका झाडाला एक हजार नारळ धरली. त्यांची सरासरी किंमत दहा रुपयाप्रमाणे…

Read More

मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानमध्ये नव्याने दाखल झालेली रुग्णवाहिका चाळीसगावसाठी नुकतीच देण्यात आली. पवारवाडी विठ्ठल मंदिर परिसर येथे कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या मान्यवरांचा सत्कार संप्रदायातर्फे करण्यात आला. तसेच आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी भिकन पवार होते. यावेळी उमंग महिला शिल्पिकाचे संस्थापक-अध्यक्ष संपदा पाटील, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभा चव्हाण, नगरसेवक बबन पवार, वैद्यकीय अधिकारी दीपक ठाकूर, कन्नड-चाळीसगाव बायपासची ट्रॅफिक हवालदार विरेंद्र सिसोदे, चाळीसगाव येथील बारा बलुतेदारचे अध्यक्ष मुकेश गोसावी, नगरसेविका विजया पवार, लद्देताई तसेच संप्रदायातर्फे उत्तर महाराष्ट्र…

Read More

जनजागृतीसह गरोदर, स्तनदा मातांना केले मार्गदर्शन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील टाकळी बु. येथील अंगणवाडीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त मार्गदर्शक मोहीम राबविण्यात आली. सुरुवातीला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सोनार यांनी सरस्वती मातेचे पूजन करून जनजागृतीसह मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका उज्ज्वला चौरे यांनी गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे, आपली शारीरिक प्रकृती यामुळे कशी सुंदर निकोप राहील, बाळाचे संगोपन कसे चांगले राहील, कोणत्या पदार्थांमध्ये कोणते विटामिन आहेत. स्तनपानामुळे बाळाला अतिसार होत नाही आदी विषयासंदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी सेविका उज्ज्वला चवरे यांनी गरोदर, स्तनदा माता यांच्यासह इतर लाभार्थी मातांना मार्गदर्शन केले. यांची होती उपस्थिती याप्रसंगी सुशिला महाजन, निर्मला…

Read More