ग्रामपंचायतीत लढले एकमेकांविरुद्ध अन्‌ गावाच्या विकासासाठी आले एकत्र

0
20

आ.मंगेश चव्हाण यांनी राबविला हिरापूर गावात पक्ष प्रवेशाचा ‘अनोखा पॅटर्न’

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

राजकारण म्हटलं तर हेवेदावे गट-तट, रुसवा, दुरावा आलाच. त्यात भावकी-भावकीत गटागटात, जाती-जातीत भांडण लावून आपली पोळी बांधून घेणाऱ्या ‘बोलबच्चन’ लोकांची सध्या चलती आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात असे वातावरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीत एकमेकांविरुद्ध लढणारे मात्र गावाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. चाळीसगाव मतदार संघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मनोमिलनाचा ‘अनोखा पॅटर्न’ हिरापूर गावात राबविला आहे.हिरापूर येथे वर्षभरापूर्वीच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे असलेले दोन विरोधक यांना एकत्र आणण्याची किमया आ.मंगेश चव्हाण यांनी साधली आहे.

भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तसेच हिरापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सतीश निकुंभ यांनी निवडणूक लढवली होती. त्यात सतीश निकुंभ यांचा पराभव झाला होता. मात्र, आता आ.मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हिरापूर गावाच्या विकासासाठी सतीश निकुंभ आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी हिरापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील उपस्थित होते.

यांनी केला भाजपात प्रवेश

राष्ट्रवादी शरद पवार गटातून माजी सरपंच सतीश निकुंभ, ग्रा.पं.सदस्य आकाश कदम, किरण निकुंभ, विकासोचे संचालक सीताराम पांचाळ, दूध सोसायटीचे संचालक लक्ष्मीकांत पाटील, संदीप शिंदे, कुलदीप निकुंभ, निलेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here