उमेदवारी जाहीर करुन उद्धव ठाकरे यांनी केला महिलांचा सन्मान

0
24

लासगावातील महिलांचा ‘उबाठा शिवसेना’ पक्षात प्रवेश

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

मला विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करून उध्दव ठाकरे यांनी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. त्यामुळे मतदारसंघातील महिला एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहत आहे. मतदारसंघात परिवर्तन होणारच, असे प्रतिपादन वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी केले. त्या लासगाव येथील प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील महिलांनी पक्षात प्रवेश घेतला. मी आपल्या कामांसाठी कटीबध्द आहे. आगामी निवडणुकीत भुलथापांना बळी न पडता ‘मशाल’ चिन्हाला मतदान करावे, असे आवाहन वैशालीताई यांनी केले.

यांची होती उपस्थिती

यावेळी उध्दव मराठे, विनोद बाविस्कर, मिथुन वाघ, धर्मसिंग पाटील, सचिन पाटील, दीपक पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र पाटील, दीपक दलवे, युग लखन दुसाने, पिंटूभाऊ, राजू शेख, हरून शेख, रवी पाटील, समीर देशमुख, परमेश्वर राठोड, नाना पाटील, कृष्णा बडगुजर, अमीन शेख, बापू भगवान पाटील, चेतन महाजन, राहूल पाटील, चंदू पाटील, सचिन राजपूत, दीपक दलवे, रवींद्र पाटील, कपिल करणसिंग, लताबाई प्रताप पाटील, विमलबाई रूपसिंग पाटील, प्रतिभा नारायण पाटील, आशाबाई भगवान पाटील, अर्चनाबाई हरी पाटील, शेहनाजबी शेख हसन व बेबाबाई अकबर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here