जळगावचा संघ राहिला अजिंक्य, चार गटातून २० संघाचा सहभाग साईमत/भुसावळ/प्रतिनिधी जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या पटांगणावर ५१ वी कुमार गट जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. स्पर्धेसाठी चार गटातून २० संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना हा कैलास क्रीडा मंडळ, जळगाव आणि जय मातृभूमी क्रीडा मंडळ, भुसावळ यांच्यात झाला. हा सामना जळगावच्या संघाने जिंकला. स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी २० खेळाडूंची निवड केली आहे. त्यांचा सराव जळगाव येथे केला जाणार आहे. बारा खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रतिनिधीत्व करतील. अंतिम सामन्यातील विजेत्या व विजेत्या संघाला कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, प्रमुख पाहुणे भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा…
Author: Sharad Bhalerao
‘घर घर संविधान’ अभियानांतंर्गत राबविले विविध उपक्रम साईमत/पारोळा/प्रतिनिधी येथील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, संचालक श्वेता बोहरा, शाळेचे प्राचार्य शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा तसेच उपस्थित शिक्षकवृंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधान प्रास्ताविकेचे पूजन करुन माल्यार्पण केले. भारतीय संविधानाबाबत विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून संविधानाचा, लोकशाहीत होणारा उपयोग व महत्त्व पटवून दिले. प्राचार्य शोभा सोनी यांनी बाबासाहेबांची जीवनशैली त्यांचे बुध्दीकौशल्य व आपला भारत देश कायदा व सुव्यवस्थेत चालावा, यासाठी दिलेली देणगी म्हणजे आपले भारतीय संविधानाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. असे आदर्श समोर ठेवून…
महात्मा जोतिराव फुले पुण्यतिथीनिमित्त राबविला उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालसभेचे आयोजन केले होते. बालसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. अध्यक्षस्थानी इयत्ता सहावी ‘अ’ची विद्यार्थिनी विशाखा भोळे होती. मंचावर मान्यवर सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्ष विशाखा भोळे हिने तिच्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प करू या, असे सांगितले. तसेच आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी…
महोत्सवात महिला संत करणार कीर्तन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी शहरातील लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे जारगाव शिवारातील वारकरी भवनात दरवर्षीप्रमाणे विश्व माऊली ज्ञानोबाराय समाधी संजीवन सोहळा व लक्ष्मी मातेच्या मार्गशीर्ष महिन्यातील उत्सवानिमित्त २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय महिला वारकरी कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार, झी टॉकीज टीव्ही स्टार, युवा महिला कीर्तनकार येणार आहे. गुरुवारी, २८ नोव्हेंबर रोजी मोनालीताई महाजन श्रीरामपूरकर यांचे कीर्तन पार पडले. २९ ला अंजलीताई शिंदे निफाडकर, ३० ला रेणुकाताई जाधव चिखली, बुलढाणा, १ डिसेंबर रोजी साध्वी सर्वेश्वरीदीदी नांदुरा, २ ला कल्याणीताई निकम थेटाळे, नाशिक, ३ ला भागवताचार्य रोहिणीताई ठाकरे चांदवड, ४ ला भागवताचार्य ज्ञानेश्वरीताई…
पोलीस स्टेशनमधील पोलिसांचा शिबिरात उत्स्फूर्त सहभाग साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, सायकलिंग ग्रुप, जॉगिंग असोसिएशन व क्रिकेट क्लबतर्फे शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिबिरात ४० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. चाळीसगावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गरजूंना लवकर रक्त उपलब्ध होत नाही. साठा पुरेसा उपलब्ध होत नाही, त्याच अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना खऱ्या अर्थाने आदरांजली मिळावी, म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख प्रितेश कटारिया, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, दत्ता भदाणे, अशोक चौधरी, सोपान चौधरी, योगेश मांडोळे, लीलाधर पाटील…
जून २०२४ पासून पुढील दहा वर्षांसाठी पाठ्यपुस्तकात राहणार साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी गुजरात राज्यातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सक्तीच्या मराठी विषयाच्या इयत्ता पाचवीसाठी प्रकाशित केलेल्या मराठी केकारव (प्रथम भाषा) पाठ्यपुस्तकात चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील लोकनेते काकासाहेब जी. जी. चव्हाण माध्यमिक आश्रमशाळेचे पर्यवेक्षक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-चाळीसगावचे कार्याध्यक्ष कवी मनोहर आंधळे यांची “अवतरले शिवराय” ही बालकविताचा जून २०२४ पासून पुढील दहा वर्षांसाठी समावेश केला आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळात कार्यरत मराठी विषय सल्लागार श्रीमती सुदेष्णा मुरलीधर कदम यांनी भ्रमणध्वनीवरुन कवी मनोहर आंधळेंना ही वार्ता कळवली. त्यात त्यांनी नमूद केले की, उपरोक्त कविता फेब्रुवारी २०२० च्या प्रसिद्ध झालेल्या पुण्यातील मासिक…
जावळे यांच्या कार्यकुशलतेचे केले विशेष कौतुक साईमत/रावेर/प्रतिनिधी रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित युवा आमदार अमोल जावळे यांचा भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. रावेर मतदारसंघात काँग्रेसचा ४३ हजार ५६२ मतांनी पराभव करत मोठ्या फरकाने विजय मिळविल्याबद्दल फडणवीस यांनी जावळे यांचे कौतुक केले. २०१९ च्या निवडणुकीत रावेर मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत अमोल जावळे यांनी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. जावळे यांना एक लाख १३ हजार ६७६ मते मिळाली. यावेळी फडणवीस यांनी रावेर मतदारसंघाच्या विजयाला अभिमानाचा अध्याय संबोधले आणि जावळे यांच्या कार्यकुशलतेचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन, चाळीसगावचे…
पत्रकार परिषदेत आमदारांनी मानले सर्वांचे आभार साईमत/पाचोरा/प्रतिनिधी स्व.के.एम बापूंच्या नंतर पाचोरा मतदार संघाला मंत्री पदाची संधी मिळालेली नाही ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्याचे नेतृत्व करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास मी सक्षमपणे काम करेल, असे सूतोवाच आ. किशोर आप्पा पाटील यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नवीन कार्यालयात दुपारी साडे तीन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मतदारसंघातील शेतकरी, जनता, महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक, कार्यकर्ते यांनी मला निवडून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आमदारांनी सर्वांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, भाजपा समन्वयक सुनील पाटील, नंदू सोमवंशी, स्वीय सहाय्यक राजेश पाटील…
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वैशाली वैराळकर यांचे प्रतिपादन साईमत/मलकापूर/प्रतिनिधी स्त्रीयांसाठी पोषण आहाराबाबत मार्गदर्शन तसेच गर्भधारणेवेळी आवश्यक असणारे महत्त्वाचे पोषण तत्त्व गरोदरपणाच्यावेळी महिलांनी बाळाच्या विकासासाठी मुख्य स्रोत हिरवा भाजीपाला, मास, चिकन, मासे, गोड मका, खजूर, तीळ, नाचणी, वाटाणे आदी हिरवा भाजीपाला पोषण आहार महिलांनी गर्भधारणे दरम्यान घ्यावा. जन्माला आलेल्या बाळाला स्तनपानाचे फायदे आईचे पहिले दूध या दुधामुळे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे बाळाची पहिले लसीकरण असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक वैशाली वैराळकर यांनी केले. भीमनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारातील सभागृहात मलकापूर एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्यावतीने अंगणवाडी, मदतनीस यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प मुख्य सेविका…
सोयगाव तालुक्यातील २१ गावांची निवड साईमत/सोयगाव/प्रतिनिधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या टप्पा क्र. दोनसाठी सोयगाव तालुक्यातील २१ गावांची निवड केली आहे. बनोटी महसूल मंडळातील ४३ गावांना मात्र त्यातून वगळण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा टप्पा क्र. दोनसाठी राज्यातील विविध गावांची निवड केली होती. या योजनेसाठी सोयगाव तालुक्यातील जरंडी, माळेगाव, पिंपरी, कंकराळा, रावेरी, सोनासवाडी, गलवाडा, आमखेडा, वरखेडी (खु), पळसखेडा, धनवट, जंगलातांडा, फर्दापूर, चोंडेश्वर, वरखेडी (बु), ठाणा, मोलखेडा, राकसा, हिंगणा, जामठी अशा २१ गावांची निवड केली आहे. सोयगाव महसूल मंडळातील आमखेडा, गलवाडा, माळेगाव, पिंपरी, कंकराळा, सोनसवाडी सहा गावांनाही वगळण्यात आले…