Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»आ.अमोल जावळे यांचा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांकडून सत्कार
    रावेर

    आ.अमोल जावळे यांचा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांकडून सत्कार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जावळे यांच्या कार्यकुशलतेचे केले विशेष कौतुक

    साईमत/रावेर/प्रतिनिधी

    रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित युवा आमदार अमोल जावळे यांचा भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. रावेर मतदारसंघात काँग्रेसचा ४३ हजार ५६२ मतांनी पराभव करत मोठ्या फरकाने विजय मिळविल्याबद्दल फडणवीस यांनी जावळे यांचे कौतुक केले. २०१९ च्या निवडणुकीत रावेर मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत अमोल जावळे यांनी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. जावळे यांना एक लाख १३ हजार ६७६ मते मिळाली.

    यावेळी फडणवीस यांनी रावेर मतदारसंघाच्या विजयाला अभिमानाचा अध्याय संबोधले आणि जावळे यांच्या कार्यकुशलतेचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जावळे यांनी महाराष्ट्राच्या विकासाला समर्पित असलेल्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) संस्थेचे सीईओ प्रवीण परदेशी (माजी सनदी अधिकारी) यांची भेट घेतली.

    रावेर विधानसभा क्षेत्रातील समस्या आणि त्यावरील उपायांवर भेटीत सखोल चर्चा झाली. क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रभावी योजना आखण्याचा निर्धार केला. आ.अमोल जावळे यांनी रावेर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी योगदान देण्याचा निश्चय व्यक्त केला. स्थानिक जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची ग्वाही दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Raver : निलंबन टाळण्यासाठी ‘डील’; वनखात्यातील लाचखोरी उघड

    January 21, 2026

    Raver : रावेर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडणुकीत राडा

    January 12, 2026

    Breaking : बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीत आढळला; ‘घातपात’चा संशय, रावेर तालुक्यात खळबळ

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.