दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात वैशाली वैराळकर यांचे प्रतिपादन
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
स्त्रीयांसाठी पोषण आहाराबाबत मार्गदर्शन तसेच गर्भधारणेवेळी आवश्यक असणारे महत्त्वाचे पोषण तत्त्व गरोदरपणाच्यावेळी महिलांनी बाळाच्या विकासासाठी मुख्य स्रोत हिरवा भाजीपाला, मास, चिकन, मासे, गोड मका, खजूर, तीळ, नाचणी, वाटाणे आदी हिरवा भाजीपाला पोषण आहार महिलांनी गर्भधारणे दरम्यान घ्यावा. जन्माला आलेल्या बाळाला स्तनपानाचे फायदे आईचे पहिले दूध या दुधामुळे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे बाळाची पहिले लसीकरण असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक वैशाली वैराळकर यांनी केले. भीमनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारातील सभागृहात मलकापूर एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्यावतीने अंगणवाडी, मदतनीस यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प मुख्य सेविका सी. एन. पाचपोळ, सोहेल शेख यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी सर्वप्रथम भारतीय संविधान दिन कार्यक्रम साजरा करीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी अंगणवाडी मदतनीस ज्योती दांडगे, अनिता वानखेडे, गुंजन अवसरमोल, सुनिता चव्हाण, सुनिता तळेकर, आफिया जरीन, फलकनाज, कौशल भिडे, रेखा सातव, अरुणा सातव, निलोफर फातिमा, रुकसार शेख निसार, दुर्गा चोपडे, शहाणा यांच्यासह मदतनीस उपस्थित होते.