Author: Sharad Bhalerao

यावल तालुक्यात ज्वारी खरेदी नोंदणी सोमवारपासून सुरू साईमत/यावल/प्रतिनिधी यावल तालुक्यात ते सुद्धा ग्रामीण भागातील कोरपावली येथे सोमवारी, २ डिसेंबरपासून आधारभूत ज्वारी खरेदी केंद्र सुरू होत आहे. परंतु ज्वारी खरेदी नोंदणीसाठी सोसायटीमार्फत तथा शासनामार्फत संबंधित शेतकरी स्वतः लागेल तसेच त्याच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर अपडेट केलेला असावा, असे तुघलकी निर्णय घेतल्याने वयोवृद्ध शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होऊन कमालीचा त्रास होणार आहे. ज्वारी खरेदी नोंदणीसाठी लाईनमध्ये उभे राहावे लागणार असल्याने शासनाने तथा कोरपावली विका सोसायटीने हा तूघलकी निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषक समाजाचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत चौधरी यांनी मागणी केली आहे. यावल तालुक्यात किमान…

Read More

आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन साईमत/यावल/फैजपूर/प्रतिनिधी नवनिर्वाचित आ. अमोल जावळे यांचा भालोद येथे रावेर, यावल तालुक्यासह पंचक्रोशीतील आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्र व इतर विकास कामांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हाध्यक्ष हरिलाल कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बेटी बचाओ अभियानचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कोळी, रावेर पं.स.सदस्य विश्वनाथ कोळी, सुनोदा येथील सुभाष सपकाळे, तांदलवाडी महाएकता फाउंडेशन अध्यक्ष योगे्श्वर कोळी, रावेर आ.कोळी महासंघ जिल्हा महासचिव मनोहर कोळी, संदीप महाले निंभोरा, राहुल कोळी पुरी, खिरवड सरपंच गोपाळ कोळी, सागर कोळी भालोद, सुभाष सोनवणे, उमेश कोळी पातोंडी, अंजाळे उपसरपंच…

Read More

श्रीमद् भागवत सप्ताह कथेचे कथावाचक शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांचे सत्संगात आवाहन साईमत/फैजपूर/प्रतिनिधी परीक्षितेची कथा सांगत असताना परीक्षिताने एखाद्या साधू महात्म्याचा विनाकारणाने मान सन्मानासाठी अपराध केला आणि म्हणून त्याला शाप घडला. परंतु शेवटी शुकदेवजी महाराज यांच्या मुखाने कथा श्रवण केली. सत्संग घडला. म्हणून सात दिवसांमध्ये त्याचाही मोक्ष झाला. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिदिन सत्संग करावा, असे आवाहन स्वामी भक्ती स्वरूपदास यांनी केले. ते येथील डी.एच. जैन विद्यालयाच्या मैदानावर स्वामीनारायण मंदीर कोरपावलीद्वारा आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहात बोलत होते. सप्ताहास २९ नोव्हेंबर रोजी सुरुवात केली असून ५ डिसेंबर रोजी कथेची सांगता होणार आहे. कथा सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ६ या…

Read More

आगीत गृहोपयोगी लाखोंचे साहित्याचे नुकसान साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील शास्त्री नगर भागातील बंद घराला घरातील देव्हाऱ्यासमोर लावलेल्या दिव्यामुळे आग लागून गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत तात्काळ आग आटोक्यात आणली. खुशालसिंग पवार यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. पवार यांनी अंदाजे लाखोंचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. संबधित विभागाने तात्काळ पंचनामा करून कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सविस्तर असे की, जामनेर शहरातील शास्त्री नगर भागातील रहिवासी खुशालसिंग दावलसिंग पवार हे आपल्या कुटुंबासोबत बाहेर गेले होते. बंद…

Read More

शैक्षणिक स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पसरले नवचैतन्य साईमत/यावल/प्रतिनिधी येथील सरस्वती विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आले. त्यात ६३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सरस्वती विद्या मंदिराच्या शैक्षणिक स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. विज्ञान प्रदर्शन दो गटात भरविण्यात आले. त्यातील पहिला गट हा ६ वी ते ८ वी व दुसरा गट ९ वी ते १० वी साठी होता. अध्यक्षस्थानी संचालक तथा मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी होते. राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर, नागपूर यांच्या दिशा निर्देशानुसार विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा निश्चित केला होता. सामाजिक पर्यावरणाला अनुकूल आणि…

Read More

शिबिरात १५७ रुग्णांची तपासणी, विविध आजारांवर मार्गदर्शन साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक ना.गिरीष महाजन यांची सलग सातवेळा आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, भारतीय जनता पार्टी, ग्रामस्थ मंडळी, गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात १५७ रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली. त्यामधील १०८ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे येत्या ४ डिसेंबरला पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक शरद अण्णा सोनार (भाजपा लोहारा-कुऱ्हाड गटप्रमुख) यांनी दिली. शिबिरात हृदयरोग ॲन्जिओग्राफी ॲन्जोप्लास्टी तपासणीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांना मोफत…

Read More

कोट्यावधींची माया जमवली, तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात साईमत/पाचोरा/प्रतिनिधी दुचाकी, चार चाकी वाहनांचे व मोठ्या वस्तूंचे अामिष दाखवून ‘लकी ड्रॉ’ व बक्षिसांची भव्य सोडतच्या नावाखाली पाचोऱ्यात लाखो रुपयांची फसवणूक करीत कोणतीही बक्षीस किंवा वस्तू न देता आरोपींनी पोबारा केल्याची घटना पाचोरा येथील साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर असे की, ‘श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस’ च्या नावाखाली पत्रक छापून त्यावर रजिस्ट्रेशन नंबर टाकून दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठ्या वस्तूंची छायाचित्र छापून बक्षिसांची लयलूट म्हणून पंधराशे रूपयाच्या कुपनचे पत्रक छापले. त्यावर बक्षिसांची भव्यतम सोडत म्हणून पाचोरा शहरासह तालुक्यातील नागरिकांची पाच हजार ५५५ कुपन वितरित…

Read More

सत्य धर्मावर आधारित विधी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार साईमत/जामनेर/प्रतिनिधी येथील सत्यशोधक समाज संघातर्फे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जे.बी.चौधरी होते. याप्रसंगी पवन माळी, प्रवीण तायडे, सदाशिव चवरे, दीपक अहिरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविकेत कैलास महाजन यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि सत्यशोधक समाज संघाविषयी माहिती दिली. सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा सचिव रमेश वराडे यांनी मनोगतात महात्मा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक विधी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. लवकरच जामनेर शहरात सार्वजनिक सत्य धर्मावर आधारित विधी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती…

Read More

दहा वर्षांपासून राबविला जातोय उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी समाज चिंतामणी प्रतिष्ठान मान्यताप्राप्त संस्थेतर्फे १ डिसेंबर ते ७ डिसेंबर वस्त्रसंकलन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. संकलनात चांगल्या स्थितीत असलेले जुने कपडे, साड्या,नवीन कपडे, थंडीचे ब्लॅंकेट, शाली, स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी साहित्य स्विकारले जाईल. त्यानंतर ते आदिवासी पाड्यावर गरजूंना वितरित केले जाणार आहे. प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून राबविला जात आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे शेकडो आदिवासी, गरजूंना उपक्रमाचा फायदा झाला आहे. उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आर. डी. कोळी (मो.क्र.९८६०७०५१०८) यांनी केले आहे.

Read More

जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे तीन गटात यशस्वी आयोजन साईमत/यावल/प्रतिनिधी येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे यावल तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके होते. वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव बाळासाहेब पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या ठिकाणी वकृत्व स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. ही स्पर्धा पाचवी ते सातवीचा पहिला गट, आठवी ते दहावीचा एक गट, अकरावी बारावीचा एक गट अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली. वकृत्व स्पर्धेत परीक्षणाचे कार्य प्रा.एस.एम.जोशी, प्रा.बी.सी ठाकूर, ए.बी.शिंदे, जे.जी.चौधरी, पी. पी.तळेले, डॉ.नरेंद्र महाले…

Read More