दहा वर्षांपासून राबविला जातोय उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
समाज चिंतामणी प्रतिष्ठान मान्यताप्राप्त संस्थेतर्फे १ डिसेंबर ते ७ डिसेंबर वस्त्रसंकलन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. संकलनात चांगल्या स्थितीत असलेले जुने कपडे, साड्या,नवीन कपडे, थंडीचे ब्लॅंकेट, शाली, स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी साहित्य स्विकारले जाईल. त्यानंतर ते आदिवासी पाड्यावर गरजूंना वितरित केले जाणार आहे. प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून राबविला जात आहे.
सर्वांच्या सहकार्यामुळे शेकडो आदिवासी, गरजूंना उपक्रमाचा फायदा झाला आहे. उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आर. डी. कोळी (मो.क्र.९८६०७०५१०८) यांनी केले आहे.