जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे तीन गटात यशस्वी आयोजन
साईमत/यावल/प्रतिनिधी
येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे यावल तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके होते. वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव बाळासाहेब पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या ठिकाणी वकृत्व स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या.
ही स्पर्धा पाचवी ते सातवीचा पहिला गट, आठवी ते दहावीचा एक गट, अकरावी बारावीचा एक गट अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली. वकृत्व स्पर्धेत परीक्षणाचे कार्य प्रा.एस.एम.जोशी, प्रा.बी.सी ठाकूर, ए.बी.शिंदे, जे.जी.चौधरी, पी. पी.तळेले, डॉ.नरेंद्र महाले यांनी केले.
पहिल्या गटात विजेते स्पर्धक प्रथम जान्हवी पाटील भारत विद्यालय न्हावी, द्वितीय एंजल चोपडे भारत विद्यालय न्हावी, तृतीय दुर्गेश चौधरी सरस्वती विद्यामंदिर यावल. दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक भार्गवी पाटील कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय फैजपूर, द्वितीय विभूषा ढाके आणि वैष्णवी श्रीखंडे भारत विद्यालय, न्हावी. तिसऱ्या गटात प्रथम क्रमांक संचित गोपाळ कोळी सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल, द्वितीय भाग्यश्री चौधरी सानेगुरुजी विद्यालय, यावल, तृतीय छाया बढे भारत विद्यालय, न्हावी यांचा समावेश आहे.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय पोषण आहाराचे अधीक्षक सचिन मगर होते. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, सुनील तळेले, विनायक तेली, उमाकांत महाजन, नितीन झांबरे, अशपाक शेख, गट समन्वयक मोहम्मद तडवी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रमांची आखणी, नियोजन करण्याचा मानस जयंत चौधरी यांनी व्यक्त केला. गटशिक्षणाधिकारी धनके यांनी विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी विविध वकृत्व वादविवाद स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगरे यांनी विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी के.जी.चौधरी, जितेंद्र चौधरी, प्रवीण तळेले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापक जी.डी कुलकर्णी, सूत्रसंचालन उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले तर आभार एस.एम.जोशी यांनी मानले.