भालोदला नवनिर्वाचित आ.अमोल जावळे यांचा सत्कार

0
10

आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

साईमत/यावल/फैजपूर/प्रतिनिधी

नवनिर्वाचित आ. अमोल जावळे यांचा भालोद येथे रावेर, यावल तालुक्यासह पंचक्रोशीतील आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्र व इतर विकास कामांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हाध्यक्ष हरिलाल कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी बेटी बचाओ अभियानचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कोळी, रावेर पं.स.सदस्य विश्वनाथ कोळी, सुनोदा येथील सुभाष सपकाळे, तांदलवाडी महाएकता फाउंडेशन अध्यक्ष योगे्श्वर कोळी, रावेर आ.कोळी महासंघ जिल्हा महासचिव मनोहर कोळी, संदीप महाले निंभोरा, राहुल कोळी पुरी, खिरवड सरपंच गोपाळ कोळी, सागर कोळी भालोद, सुभाष सोनवणे, उमेश कोळी पातोंडी, अंजाळे उपसरपंच धनराज सपकाळे, अंजाळे ग्रा.पं. सदस्य कैलास सपकाळे, अशोक सपकाळे, राजेंद्र कोळी, भगवान कोळी, ईश्वर कोळी, आकाश कोळी, अनिल कोळी, नाना कोळी, भालोद सरपंच प्रदीप कोळी, जितू कोळी, बाळा कोळी, योगेश कोळी बोरावल, रविंद्र कोळी, समाधान कोळी, गोपाळ कोळी कठोरा, सुनील सोनवणे, रविंद्र सोनवणे दुसखेडा, भिमराव तायडे, विनायक सपकाळे कासवा यांच्यासह रावेर, यावल तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here