कामगार कल्याण मंडळ आयोजित शिबिरात १५० कामगारांची आरोग्य तपासणी

0
18

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत अमर डेअरी येथे कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमर डेअरीचे संचालक अक्षय खत्री होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्लांट हेड अविनाश चंदनशे, एच.आर.पी.एस.दिक्षीत, न्यु गणपती हॉस्पिटलचे कल्पेश सुर्यवंशी होते.यावेळी डॉ.मितेश घुगे,डॉ. कृतिका जाधव यांनी १५० कामगारांची बी.पी.,शुगर, इ.सी.जी. तपासणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले कार्यक्रमास राजेश जाधव,टी.सी.पाटील व न्यु गणपती हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here