साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन,जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. महाविद्यालयातील बी. सी. ए. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनींनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा. योगिता घोंगडे यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमाच्या च्या विद्यार्थ्यानी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयाच्या एम.बी.ए, एम.सी.ए, बी.बी.ए व बी. सी.ए च्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा.चारूशीला चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय , तसेच ओरीऑन इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या आगमनाचे स्वागत केले. गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांचे सुपुत्र कुणाल कृष्णकुमार फालक व सायली कुणाल फालक या दाम्पत्याच्या हस्ते श्रींच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनी परिश्रम घेऊन गणरायाच्या मूर्तीची आरास तयार केली.प्रसंगी शाळेच्या मुख्या.प्रणिता झांबरे ,पर्यवेक्षक नरेंद्र पालवे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी शिवसेना (उबाठा ) तर्फे राज्यभर “होऊ द्या चर्चा ” हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठीच्या पूर्वतयारीची बैठक शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेत झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, पियुष गांधी अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख झाकीर पठाण, महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, नीलू इंगळे, विमल वाणी, निता संगोळे आदी उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने केंद्र व राज्य सरकारच्या जण विरोधी धोरणांच्या विरोधात…
साईमत जळगाव प्रतिनिधी राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढल्याने याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी आकाशवाणी चौक परिसरात निषेध आंदोलन केले. यावेळी कंत्राटी सरकार हाय -हाय, रोजगार द्या, नाहीतर खुच्र्या खाली करा, रद्द करा -रद्द करा, कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा आदी घोषणा देण्यात आल्या. राज्यात अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण सरकारने ठेवले नाही. हि कृतीच मूळात असंवैधानिक आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार…
साईमत जळगाव प्रतिनिधी १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश उत्सवासाठी शिंपी समाजातील तळागाळातील समाज बांधवांना एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे संकल्प केल्याप्रमाणे आकर्षक गणेश मूर्ती वितरण १७ सप्टेंबर रोजी संकल्पपूर्ती कांचननगर परिसरातून करण्यात आली.संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेव महाराज यांचे प्रतिमेस संस्थाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी माल्यार्पण करून केली.पूजन अ.भा.उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी यांनी केले. प्रास्ताविक संस्था सचिव सुजित जाधव यांनी केले. चंद्रकांंत जगताप, किशोर निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कांचननगर परिसरातील अनेक समाज बांधव संस्थेत सहभागी झाले परिसरातून बहुसंख्य समाज बांधव भगिनी यांना गणेशमूर्ती वितरीत करण्यात आल्या. यावेळी “गणपती बाप्पा मोरया“मंगल मूर्ती मोरया “असा गजर…
साईमत जळगाव प्रतिनिधी सुधर्मा सामाजिक संस्था जळगांव परिसरातील गरीब कचरावेचक महिलांसाठी कार्य करते.या महिलांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांना रेशन व इतर शासकीय योजनांचा लाभ होत नाही. यासाठी सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे या महिलांना रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार तहसिलदार जळगांव यांचेकडे १ महिन्यापूर्वी उपलब्ध कागदपत्रासह अर्ज केला. यानंतर नायब तहसीलदारांनी संबंधित महिलांचे रेशनकार्डकामी त्यांच्या मोबाईल नंबरची आवश्यकता कळवली तसेच या मोबाईलवर ओटीपी येईल व त्यानंतर संबंधितांना रेशन मिळेल परंतु या महिलांची कमाई तुटपुंजी असल्याने सर्व महिलांकडे मोबाईल नाही. त्यांचे स्वत:चे सीमकार्ड नाही.तरी याबाबत दुसरा काही मार्ग काढता येईल…
साईमत जळगाव प्रतिनिधी १५ सप्टेंबर हा दिवस भारताचे सुप्रसिद्ध अभियंते सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्म दिवस आहे. विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची दाखल घेत केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस देशभरात ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालय येथे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त व्यावसायिक अभ्यासक्रम मंडळा अंतर्गत इयत्ता 5वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते ख्यातनाम अभियंते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने तालुकस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. तसेच शालेय जिल्हास्तरिय १४ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे १४ वर्षाखालील मुलांच्या तालुकस्तरीय शालेय स्पर्धा २०२३-२४ या शुक्रवार, दि.१५ सप्टेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे विद्यार्थी चि.सोहम सुशील बनसोडे, चि.यश संदीप पाटील, चि.घनश्याम श्रीराम पाटील आणि चि. भावेश संतोष चौधरी यांनी उत्कृष्ट खेळाचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील मनियार बिरादरीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे जे तरुण, वृध्द समाजकार्यात अग्रेसर असतात त्यांचा ” समाज रत्न” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वयं रोजगार अंतर्गत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीची वार्षिक सर्व साधारण सभा बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली टिक्की ईस्टेट जळगाव येथे पार पडली. या सभेत महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या रफिक नादर व आसिफ मेहबूब – बोदवड , शफी इस्माईल – कजगाव, जावेद करीम -…