शानभाग विद्यालयाला तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

0
19

साईमत जळगाव प्रतिनिधी

कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने तालुकस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. तसेच शालेय जिल्हास्तरिय १४ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे १४ वर्षाखालील मुलांच्या तालुकस्तरीय शालेय स्पर्धा २०२३-२४ या शुक्रवार, दि.१५ सप्टेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे विद्यार्थी चि.सोहम सुशील बनसोडे, चि.यश संदीप पाटील, चि.घनश्याम श्रीराम पाटील आणि चि. भावेश संतोष चौधरी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
तर शनिवार, दि.१६ सप्टेंबर रोजी एरंडोल येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरिय १४ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या मुलांच्या संघातील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यात चि.भावेश संजय चौधरी या विद्यार्थ्याने कांस्य पदक पटकावले.
विजेत्या संघाचे आणि खेळाडूंचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील तसेच विद्यालयाचे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे करण्यात आले.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय यादव, क्षितिज सोनवणे, जितेंद्र पाटील, सिद्धार्थ शिंदे, ललित लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here