जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने गुणवंतांसह सामाजिक कार्य करणाऱ्यांचा केला गौरव

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यातील मनियार बिरादरीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे जे तरुण, वृध्द समाजकार्यात अग्रेसर असतात त्यांचा ” समाज रत्न” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वयं रोजगार अंतर्गत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीची वार्षिक सर्व साधारण सभा बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली टिक्की ईस्टेट जळगाव येथे पार पडली. या सभेत महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या रफिक नादर व आसिफ मेहबूब – बोदवड , शफी इस्माईल – कजगाव, जावेद करीम – भडगाव, नईम खान फैजपुर आदर्श शिक्षक ) हकीम चौधरी व कलीम रसूल मुक्ताईनगर, आबिद हारून, जूलकर नयन, मुजाहिद खान (सिकलगर बिरादरी), वसीम शेख ( इतर बिरादरी), मोहसीन शेख, जावेद करीम (सर्व जळगाव ) तसेच जळगावचे डॉ. अताऊर रहमान यांनी आपल्या चार ही मुलांचे शिक्षण एमबीबीएस व एम एस, एम डी केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. असीम इलियास यांना मिळालेल्या आयुर्वेदाचार्य व त्यांच्या औषधीने मिळत असलेल्या गुणांमुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्वयं रोजगार अंतर्गत जुबेदा भी अमजद बोदवड, शाहीन बी शरीफोद्दिन चोपडा, शबाना शरीफ पिंपळकोठा , मएराज बी शेख इकबाल वरणगाव, राहील अंजुम व आस्मा सलीम जळगाव आदी महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी पुरस्कारार्थी
दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह सोशल वर्क पदवी, बी फार्म, बीएससी, नीट, आयटीआय, एमसीए, एलएलबी, या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात आयेशा खान, मसीरा शेख, हुमेरा नाज,शांजिया समीर, अमन अकबर,हुजैफा मन्सूर, नर्गिस करीम,सालेहा फिरदोस, तहमिना फरीद, अफसाना अजिज, अल्ताफ फारूक, आयतुल्ला असदुल्ला,अक्सा असदुल्ला, झुबियानाझ जाहीद,अनम कौसर, मुशाहीद हनीफ, झवेरिया खलील, तांझिला परवीन, तांजिला मुश्ताक, खानसाबतुल लियाकत,सना परवीन नासिर, कौसर अमिन, मुस्कान शब्बीर मणियार, अहतेशाम हारून, तफज्जुल शाद असलम,तमसील असलम, अल्ताफ आसिफ, कासिम करीम, मुबशशेरा अलीम, जुनेद शकील, रिजवान रईस, तलहा तय्यब, कनीज नदीम, अझहर कलीम, मुस्तकीम शकील, जौफिन मोहम्मद युनूस, अल्ताफ असिफ, एडवोकेट शेख मुस्तकीम व एडवोकेट अलतमश कालू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here