साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जळगाव जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था सर्प मानव आणि पर्यावरण या विषयावर शून्य सर्पदंश अभियान राबवित आहे. यातून जनजागृती, सर्पदंश, प्रथमोपचार, आणि अंधश्रध्दा निर्मुलन यावर कार्य करत आहेत. तर संस्थेचे…
Author: Saimat
साईमत मुंबई प्रतिनिधी प्रधानमंत्री यांच्या दृढ संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे दूरदृष्य प्रणालीव्दारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी…
साईमत जळगाव जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शहरातील कांताई सभागृहात झालेल्या १४ व्या ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक पटकावला. विजयी संघामध्ये गीत जैन, विधी सोनी, पेहेल गद्या,संजम चाबडा, तान्या चतरानी, लबडी पांगरिया, तस्नीम बदामिया या खेळाडूंचा समावेश होता. विजयी ठरलेल्या विद्यार्थिनीचा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, या संघास जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक मंडळ, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामागे…
साईमत जळगाव जळगाव गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या… असे म्हणत डीजे समवेत गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणूकी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील तसेच भावी खासदार डॉ.केतकी पाटील यांच्यासह पाटील कुटूबियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात पाच दिवसांचा गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी महाविद्यालय परिसरात आकर्षक सजावट करुन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन दाखविणारा देखावा देखील यावर्षीचे आकर्षण ठरला. शनिवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला वाजत-गाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. मिरवणूकीत संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील,…
साईमत जळगाव जळगाव जागतिक रूग्ण सुरक्षा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयात १७ ते २२ सप्टेंबर पर्यंत संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांवर परिसंवादांतर्गत मंथन करण्यात आले. यात निवासी डॉक्टर यांनी संसर्गापासून रूग्णांची पर्यायाने रूग्णालयाची सुरक्षा या विषयावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केले. नॅशनल मेडिकल कौन्सिल दिल्लीच्या गाईडलाईन्सनुसार पाच दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली होती. १८ सप्टेंबर रोजी मॉक ड्रिल फॉर फायर सेफ्टी हा प्रोग्राम फायर सेफ्टीचे प्रशिक्षक व हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ सोबत साजरा करण्यात आला. दि १९ सप्टेंबर रोजी मेडिकेशन सेफ्टीविषयी हॉस्पिटल मध्ये संवादा द्वारे जागृती करण्यात आली. दि २० सप्टेंबर रोजी हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल समितीचे सचिव डॉ.कैलास वाघ यांनी हॅण्ड हायजिन…
साईमत जळगाव जळगाव गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथे आज सिम्युलेशन आधारित लर्निंग ओरिएंटेशन कार्यक्रमाचे सत्र आयोजित केले होते. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील प्रा. पीयूष वाघ यांनी नुकतेच एनआरएससी अंतर्गत एसजीटी विद्यापीठात प्रशिक्षण घेतले होते, ज्याची आयएनसी दिल्लीद्वारे नामांकनासाठी निवड झाली आहे. त्यांनी एकदिवसीय टीओटी कार्यक्रम दिल्याने सर्व शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी सुमित सर, रश्मी मॅडम, प्रिती मॅडम, सागर सर, शुभांगी मॅडम, मनोरमा मॅडम, श्वेता मॅडम, सूरज सर, डॉ. प्रियदर्शनी मॅडम यांनी देखील स्क्रिप्टमध्ये त्यांच्या भूमिका केल्या आहेत. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रशासक प्रविण कोल्हे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
साईमत जळगाव जळगाव श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालय, जळगाव तर्फे जागतिक औषधनिर्माता दिन साजरा करण्यात आला. समाजामध्ये औषध साक्षरता निर्माण करण्याच्या हेतूने जागतिक औषधनिर्माता दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीला सुरुवात करून दिली. प्रभात फेरीचे विसर्जन बांभोरी गावात झाले. बांभोरी गावचे सरपंच सचिन बिराडे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांना जागतिक औषधनिर्मातादिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील अध्यापक अनिस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. समाजामध्ये औषध साक्षरता निर्माण होणे गरचेचे असल्या कारणाने विविध फलकाद्वारे विद्यार्थ्यांनी औषध वापरा संबंधित तसेच औषधनिर्माणशास्त्र…
साईमत जळगाव जळगाव खेळाडूंमध्ये असलेली चिकाटी वृत्ती व आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती यामुळे तो व्यवसायात नक्कीच यशस्वी होतो म्हणून विद्यार्थ्यांनी प्रथम ना नफा ना तोटा इथून व्यवसायाची सुरुवात केल्यास तो निश्चितच यशस्वी होईल यात शंका नाही असे मत एम एम एन एफ (महाराष्ट्र मायनॉरिटी एनजिओ फोरम) चे राज्याचे अध्यक्ष जाकीर शिकलगार (पुणे) यांनी व्यक्त केले ते क्रीडा संकुल येथे १९वर्ष आतील मुलं आणि मुलींच्या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेचा समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांचे सहकारी अब्दुल मजीद, (कतर) अहसान सय्यद (वरणगाव) जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष जफर शेख (पिंच बोटेलिंग एम डी) सचिव फारूक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक मनोज…
साईमत भुसावळ प्रतिनिधी शहरात विविध समस्यांमुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे भुसावळ नगरपरिषदेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या अनुषंगान शिवसेनेच्या (उबाठा) वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला होता.दरम्यान, आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी न.पा.मुख्याधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक लावण्यात आली होती. यावेळी येत्या १० दिवसात सर्व समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, न.पा. मुख्याधिकारी महेश वाघमोडे, शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे , बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक पप्पू बारसे, स्वप्निल सावळे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, पिंटू भोई, अमजद शेख, नबी पटेल, मनोज पवार, महमूद शेख, राकेश खरारे, अरुण साळुंके आदि पदाधिकारी,…
साईमत फैजपूर प्रतिनिधी कै. यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन कार्यपद्धतीचे प्रदर्शनी पांडुरंग सराफ यांच्या निवासस्थानी दिनांक २५ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर पर्यंत लावण्यात आलेले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावेर लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, बी. के. चौधरी, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, भाजप शहराध्यक्ष अनंता नेहेते, नितीन राणे, जयश्री चौधरी, भारती पाटील, लता मेढे, बापू वाघुळदे, रवींद्र होले, प्रभाकर सपकाळे, संजय सराफ, पांडुरंग सराफ, रामा होले, पिंटू तेली, सिद्धेश्वर वाघुळदे, युगंधर पवार, वसंत कापडे, वसंत परदेशी आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जिवन कार्याची…