साईमत जळगाव जळगाव
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथे आज सिम्युलेशन आधारित लर्निंग ओरिएंटेशन कार्यक्रमाचे सत्र आयोजित केले होते.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील प्रा. पीयूष वाघ यांनी नुकतेच एनआरएससी अंतर्गत एसजीटी विद्यापीठात प्रशिक्षण घेतले होते, ज्याची आयएनसी दिल्लीद्वारे नामांकनासाठी निवड झाली आहे. त्यांनी एकदिवसीय टीओटी कार्यक्रम दिल्याने सर्व शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.
याप्रसंगी सुमित सर, रश्मी मॅडम, प्रिती मॅडम, सागर सर, शुभांगी मॅडम, मनोरमा मॅडम, श्वेता मॅडम, सूरज सर, डॉ. प्रियदर्शनी मॅडम यांनी देखील स्क्रिप्टमध्ये त्यांच्या भूमिका केल्या आहेत. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रशासक प्रविण कोल्हे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.