साईमत जळगाव जळगाव
श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालय, जळगाव तर्फे जागतिक औषधनिर्माता दिन साजरा करण्यात आला. समाजामध्ये औषध साक्षरता निर्माण करण्याच्या हेतूने जागतिक औषधनिर्माता दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीला सुरुवात करून दिली. प्रभात फेरीचे विसर्जन बांभोरी गावात झाले. बांभोरी गावचे सरपंच सचिन बिराडे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांना जागतिक औषधनिर्मातादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील अध्यापक अनिस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. समाजामध्ये औषध साक्षरता निर्माण होणे गरचेचे असल्या कारणाने विविध फलकाद्वारे विद्यार्थ्यांनी औषध वापरा संबंधित तसेच औषधनिर्माणशास्त्र ज्ञान शाखेसंबंधी माहिती दिली. औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल लांडगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधन केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व विश्वस्त रावसाहेब शेखावत यांनी आनंद व्यक्त करत कौतुक केले.