साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे प्रतिमांसह आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आली आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई केली आहे. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती येत आहे. लालबहाद्दूर शास्त्री टॉवरवर प्रभू श्रीरामांचे विराट दर्शन श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी ८०…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि २२ जानेवारी रोजी होत असून या सोहळ्याला जाण्यासाठी संत नामदेव महाराजांचे १७ वंशज ह. भ. प. निवृत्ती व मुरारी नामदास महाराज १० वारकरी बांधवांसह १९ जानेवारी रोजी कृषीनगर एक्सप्रेस ने निघाले आहेत. त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी श्रीराम च्या जय घोषात स्वागत करण्यात आले. जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ७:१५ वाजता श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव तसेच गणनाम परीवार राम भक्तांच्या वतीने त्यांचा पुष्प हार व संस्थेचा मानाचा गमछा व भगवी शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक एकनाथराव बबन टेलर यांनी खास अयोध्येध्येतील श्रीराम मंदिर…
साईमत जळगाव प्रतिनिधी गेल्या ३ दशकातील शिक्षण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील ईनोवेशन विद्यापीठातर्फे भरत अमळकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनरिस कौसा (डी.लिट.) या पदवीने महराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले. भरतदादा अमळकर यांच्या शिक्षण व सामाजिक उद्योजकता या दोन क्षेत्रातील ३ दशकांच्या नाविन्य व वैविध्यपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ तसेच सीव्हील ईंजीनिअर व बांधकाम व्यावसायीक असलेले भरतदादा यांना डॅाक्टरेट पदवी देण्यात आली. ते शिक्षण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रात गेल्या 30 -32 वर्षापासून कार्यरत आहेत. श्रध्देय डॉ. अविनाश आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भरतदादांनी विवेकानंद प्रतिष्ठानची स्थापना केली.…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे, जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन मार्च २०२४ अखेर एकही अपील प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, आयोगाचे कक्ष अधिकारी उदय कांनंव, सहायक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके आदी उपस्थित होते. श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या की, जनतेला पारदर्शक,…
साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेतून विजयी झालेल्या संघातून के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ मुली व २ मुले अशी सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिव्या ठाकरे, दिव्या झोपे, खुशी गुजर, विनिता पाटील या ४ मुली आणि आयुष बेंडाळे व वैभव बारी या २ मुलांची शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर स्पर्धा गारखेडा रोड छत्रपती…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी जिल्हा दौऱ्यावर आल्या असता अधिसूचित लोकसेवा पुरविणाऱ्या कार्यालयाचे तपासणीचा भाग म्हणून आयोगाने प्रभाग समिती क्रमांक १ चे कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली. वं कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तदनंतर मनपा सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी कक्ष अधिकारी उदय कानव्व, सहाय्यक कक्षा अधिकारी प्रशांत घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी मनपाचे अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त करून निर्देश दिले की, लोकसेवा हक्क कायद्यातील सेवा नागरिकांना वेळेत द्यावी. या अधिनियमान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक गतिमान व कालबद्ध…
साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्याला होत असलेल्या प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे आकर्षक कटआऊटसह सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री टॉवर चौक, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात येत आहे. यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येणार आहे. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती होईल. श्रीराम मंदीर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सात अधिवासांमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते…
साईमत जळगाव प्रतिनिधी कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळातही आपादग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आपल्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना, नैसर्गिक आपत्तीत मयत व्यक्तींच्या वारसांना व नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्याना मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे प्रदान करण्यात आला.…
साईमत जळगाव प्रतिनिधी सुपारीच्या व्यसनामुळे तोंडात झालेल्या गाठीचे निदान झाल्यानंतर निंभोरा येथील ५० वर्षीय महिला रूग्णावर कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांनी जोखमीची कमांडो शस्त्रक्रिया यशस्वी केली. याबाबत माहिती अशी की, निंभोरा येथील एका ५० वर्षीय महिलेला सुपारी खाण्याची सवय होती. या सवयीमुळे महिलेचा गाल दुखू लागला होता. या महिलेने स्थानिक रूग्णालयात दाखविले असता तात्पुरते उपचार करण्यात आले. मात्र महिलेच्या जबड्याचे दुखणे वाढल्याने अखेर त्यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे यांच्याकडे दाखविले. डॉ. भारंबे यांनी बायप्सी तपासणी केली असता तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले. तसेच सीटी स्कॅनद्वारे कर्करोग कुठल्या टप्प्यात आहे यांची तपासणी करण्यात…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आयआयटी मुंबई यांनी केलेल्या सामजंस्य करारातंर्गत उन्नत महाराष्ट्र अभियानाचा एक भाग म्हणून “आपले प्रश्न आपले विज्ञान” कार्यशाळेत ४० प्राध्यापकांना गुरूवार दि. १८ जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमजबजावणीसाठी विद्यापीठ कटिबध्द असून त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा असल्याचे प्रा. इंगळे यांनी सांगितले. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना समुदाय सहभाग, क्षेत्रीय कार्य आधारित अभ्यासक्रम तसेच इंटर्नशिपच्या माध्यमातुन अनुभवजन्य अध्ययन प्राप्त व्हावे या दृष्टीकोनातून “आपले प्रश्न आपले विज्ञान” या मोड्यूलवर आधारित एक दिवशीय कार्यशाळेत तीनही जिल्ह्यातील…