Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर तब्बल दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी पोलिसांना शरण आले. दुपारी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, निलंबित निरीक्षक बकाले यांना जळगाव न्यायालयात आणण्यात येणार असल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बकाले यांना न्यायमूर्तींच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात शबरी आवास योजनेत‌ यावर्षी पाच हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले‌ आहे‌. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दीड हजार लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले आहेत. भविष्यातही जिल्ह्यातील एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून पासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. गावा – गावात आदिवासींसाठी दफनभूमी, एकलव्य स्मारक, आदिवासी वस्त्यांवर सौर दिवे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजाला देण्यासाठी शासन कटीबद्ध असून माझ्यासह शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे‌. असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते. धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे “शासन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महा स्वच्छता अभियानास ३१ डिसेंबर २०२३ रोजी सुरूवात केली. या महा स्वच्छता अभियानात आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मंदीर स्वच्छता अभियान ही राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महा स्वच्छता अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीमध्ये २०५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ११४ प्रमुख मंदीरांमध्ये ही पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार मंदीर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘महा स्वच्छता अभियानास’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथून, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जामनेर येथून तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथून सुरूवात…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील शिक्षीका डॉ. वंदना भामरे यांना प्रतिष्ठेचा बी.एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून त्यांना हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय परीषदेत तो प्रदान करण्यात आला. डॉ. वंदना भामरे आणि एसएसव्हीपीएस सायन्स कॉलेज धुळे येथील गणित विषयातील प्रा.डॉ.एम.एम.पवार यांना 2023 सालच्या 89 व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात बी.एन. वाफारे पुरस्कार जाहिर झाला. बीआयटीएस पिलानी, हैदराबाद कॅम्पस येथील मॅथेमॅटिकल सोसायटीने “कव्हरिंग एनर्जी ऑफ पोसेट अँड इट्स बाउंड, मॅथेमॅटिका बोहेमिकामध्ये प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट शोधनिबंधासाठी प्रा. पी. के. त्रिविक्रम यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला. सन्मानपत्र आणि रोख पुरस्कार रु. 25000/- याचा पुरस्कारात समावेश आहे. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी.जैन आणि…

Read More

   धरणगाव : प्रतिनिधी    तालुक्यातील साळवे येथील  ग्राम सुधारणा मंडळ संचलित साळवे इंग्रजी विद्यालयात दहावीच्या सन २००४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेही भेट मिलन सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला व आपले अनुभव कथन केले. २० वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेही भेट आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला व यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शिक्षकांनीही  माजी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपला प्रवास कथन करतांना ,आपल्यासमोरील आव्हानांना आपण कसे सामोरे गेलो हे स्पष्ट केले तर काहींनी सध्या आपण  कोणत्या क्षेत्रात व कुठे कार्यरत आहोत,याबाबत माहिती दिली.मेळाव्यानंतरदेखील अनेक विद्यार्थी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे न्यू जय बजरंग क्रिकेट क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पालकमंत्री क्रिकेट चषकाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे नम्र आवाहन त्यांनी केले. एरवी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आजच्या क्रिकेट मॅच मध्ये देखील चौकार – षटकारासह फटेकबाजी करताच उपस्थितांनी त्यांना भरभरून दाद दिली. स्पर्धेचे आयोजन विशाल कुमावत, गौरव झंवर, विशाल चौधरी व…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील शाळांना सुंदर व आदर्श करण्यासाठी भौतिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सदर अभियान शाळांसाठी आधार असून शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांसह समाज घडवण्याचे कार्य करत असतात. बदलत्या काळानुसार मुख्याध्यापकांनी अद्यावत राहून डिजिटल झाले पाहिजे. प्रथम येणाऱ्या शाळेला ३ लाखाचे बक्षिस देणार असल्याची घोषणा करून मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून राज्यात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल येथे पंचायत समिती, जळगाव आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ-सुंदर शाळा” अभियानाच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ सुप्रसिद्ध नाटककार पद्मश्री. सतीश आळेकर यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी सुमती लांडे, श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी अशोक कोतवाल तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी सीताराम सावंत यांना दि.१६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० ला, कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे सन्मानपूर्ण वितरीत करण्यात येणार आहे. ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली, सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड समितीचे सर्व सदस्यही उपस्थिती देणार आहेत. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शिव कॉलनी परीसरातील गणपती मंदिर प्रांगणात श्री रुद्रेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मंदिराला कळस व ध्वजपूजन महामंडलेश्वर परमपूज्य इंद्रदेव स्वरा आनंद सरस्वती यांचे हस्ते झाले. शिव कॉलनी परीसरात २७ डिसेंबर पासून ८ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.या दहा दिवसात श्रीमद् भागवत कथा, भजन, कीर्तन, हरिपाठ, काकड आरती, सुंदर कांड, भोले बाबांचे गीते अश्या कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय वातावरणात नाऊन निघाला. दि. ५ जानेवारी रोजी बैलगाडीवर शिवलिंगाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मुख्य आकर्षण शंकरजींची सजीव आरास होती, झांज पथक, बँड रस्त्याच्या दुतर्फा डबल मजली रंगीबेरंगी आठ-आठ…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह ११ ते १५ जानेवारी राबविण्यात येत आहे. त्याची औपचारिक सुरुवात झाली. या वर्षाची संकल्पना ” रस्ता सुरक्षेचे नायक व्हा ” Be a road safety Hero या प्रमाणे आहे. सर्व सहकाऱ्यांना वाहतूकीचे नियमांचे पालन न करणे, अधिक वेगाने गाडी चालविणे, हेल्मेट न वापरणे, सिट बेल्टचा वापर न करणे इत्यादी गोष्टी करू नयेत. त्याविषयी जनजागृती व विषयावर प्रक्षिशण देण्यात आले. रोडवरील छोट्याशा चुकीमुळे अपघात होतात, कुटुंबाची वाताहत होते झाल्याचे , सहकाऱ्यांना वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तरीही,”शुन्य अपघात असा संकल्प ” त्याच प्रमाणे हेल्मेट वापरणे, सिट बेल्टचा वापर…

Read More