साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, मधिल प्राथमिक विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी संजीवनी स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले. या स्पर्धेत गुर्वेश जेऊरकर, मोहित पवार, रुद्र निंबाळकर, सारा अजनाडकर यांनी सुवर्ण पदक पटकावले आणि वेदांत प्रवीण पाटील, वेदांत विठ्ठल पाटील, ध्रुव पाटील, लिंगेश पाटील, नैतिक पाटील, गोविंद पाटील, सुरज शर्मा, विश्वजित निकम, गीतेश राणा, रुचा जेऊरकर, कृतिका महाजन, परीधी सोनार आणि काव्या खडके यांनी रौप्य पदक तर यश सपकाळे आणि जागृत निकुंभ यांनी कांस्य पदक मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव स्कूल चे प्राचार्य प्रवीण सोनवणे आणि समन्वयिका स्वाती अहिरराव यांच्या हस्ते…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी या वर्षी अ भा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण ९ ठिकाणी साजरे होत असुन त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर “नाट्यजागर” सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील 22 केंद्रांवर होणार असुन, त्यातील एक केंद्र “जळगाव” आहे. रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या या ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजनानिमित्त जळगावा जिल्हा मराठी नाट्य परिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्य संगीत स्पर्धा आयोजित…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित कार्यक्रमात आयएफआरएमच्या सदस्यांनी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध भक्तीगीते सादर करीत राममय वातावरण निर्माण केले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांची सामूहिक आरती करण्यात आली. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमास रोटरी वेस्टच्या अध्यक्ष सरिता खाचणे, माजी अध्यक्ष नितीन रेदासनी, अनिल कांकरिया, योगेश भोळे , सुनील सुखवानी, आयएफआरएमच्या जळगाव चॅप्टर चेअरमन डॉ. अपर्णा मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी प्रांतपाल शब्बीर शाकीर व डॉ. राजेश पाटील यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी राम आयेंगे – शिल्पा सफळे, रामजी की निकली सवारी – डॉ. सुशीलकुमार राणे, हे राम हे राम – अमित माळी, कौसल्येचा…
साईमत जळगाव प्रतिनिधी ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’ आयोध्येत स्थापन झालेल्या प्रभु श्री राम यांचे रूप डोळ्यांमध्ये बसवा. आपली जी बुद्धी आहे त्यात रामांना पाहून सुखी झाले पाहिजे. राग, व्देष, वैर आणि भय या चार गोष्टीचा त्याग केल्याने बुद्धी सुखरूप होते. तसेच हनुमंत भेट, बालीवध, वनलीला व सेतू बंध, विभीषण भेट, इंद्रजीत, कुंभकर्ण, रावणवध आणि प्रभु श्री राम यांचे राज्याभिषेक सोहळा जी. एस. मैदानावर उत्साहात साजरा झाला. आज पंच दिवशीय कथेत प्रभु रामांच्या विविध आदर्शांचे उदाहरण देवून हभप परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी कथेत विषद केली. प्रभु श्री राम यांचा आदर्श सर्वांनी अंगिकारला पाहिजे आणि बुद्धीत आणला पाहिजे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव रनर्स ग्रुपच्या किमान ६० सदस्यांनी गेल्या दोन महिन्यापासून टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव शहर ,बहिणाबाई विद्यापीठ ,मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला तसेच या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते टाटा मुंबई मॅरेथॉन जगातील नामांकित मॅरेथॉनपैकी एक आहे.यात यावर्षी ५५ हजार स्पर्धक जगभरातून सहभागी झाले होते त्याचाच एक भाग म्हणून जळगाव रनर्स ग्रुपचे ५० पुरुष व १० महिला यांनी यात सहभाग नोंदविला. यापैकी 40 जण हे पहिल्यांदा टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले. ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन तसेच २१ .किलोमीटर मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. जास्तीत जास्त वेगाने…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उत्साह शिगेला पोहोचला आहे.चित्रपट विषयक प्रदर्शनी , शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. यंदा या महोत्सवाचे ३रे वर्ष असून खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रितांन मध्ये जळगावचे मूळ रहिवासी आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचाही समावेश होता . ते या भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून ८८९ जणांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते त्यात ५०६ विशेष निमंत्रित होते. यात जेष्ठ विधीतज्ज्ञ आणि पदमश्री पुरस्कार प्राप्त विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. त्यात ॲड.उज्ज्वल निकम यांचे समावेश करण्यात आला असल्याने ही उत्तर महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे. हा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक…
साईमत जळगाव प्रतिनिधी खडके बालगृह अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समितीला बरखास्त करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे सुरु असलेल्या अन्नत्याग उपोषणाला दि. २३ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा वकील संघाने पाठिंबा दिला. महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे राज्य उपाध्यक्ष अॅड. दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी दि. १९ जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दिला आहे. बाल लैंगिक सारख्या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बालकल्याण समितीने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र तसं न झाल्याने पीडित बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘मासू’ विद्यार्थी संघटनेने बेमुदत…
साईमत जळगाव प्रतिनिधी वंचित व गरिबांची मदत हिच ईश्वराची पुजा असे मानून सुधर्मा संस्थेद्वारे शहरातील महाबळ परिसरातील देवेंद्र नगरातील श्रीराम मंदिरात अयोध्या येथील राम मुर्ती प्रतिष्ठापणेच्या दिवशी सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे, सुनिता बेलसरे यांचे हस्ते श्रीरामाचे पुजन व हवन करण्यात आले. यावेळी कचरावेचक महिलांना किराणा वाटप करत दोन गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. यावेळी हेमंत बेलसरे यांनी राममंदिराच्या उभारणी बद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले व सर्वांना रामराज्याची संकल्पना समजावून सांगत त्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी आपणास शबरीची व वाल्मिकी ची गोष्ट नेहमीच प्रेरणा देते असेही त्यांनी सांगितले. प्रसंगी राममंदिराचे व्यवस्थापक जेष्ठ नागरिक शंकरराव कामठे, धर्मराज पाटील, महेंद्रसिगं राजपूत यांचा…
साईमत जळगाव प्रतिनिधी जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन दिनांक १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १४, १७ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुली सांघिक अशा स्वरूपात घेतल्या जातील. या स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग…