साईमत जळगाव प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या, अंतिम सामन्यांमध्ये सांगली विभागाचा पराभव करून नाशिक विभागाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजेता ठरला. विजेत्या संघात दिव्या ठाकरे , करीना भोपे , आदिती पाटील , दिव्या झोपे , तुलसी कुलकर्णी , सेजल पाटील , खुशी गुजर , विनिता पाटील , अक्षदा तायडे , दुहिता पाटील , प्रेरणा गायकवाड , नित्यांजली सोनवणे आदी खेळाडूंचा सामावेश होता. त्यांना क्रीडा शिक्षक प्रा.डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई एज्युकेशन सोसायटी संचालीत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाची शैक्षणिक सहल जगप्रसिदध अजिंठा लेणी येथे संपन्न झाली. सहलीमध्ये शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणी येथे विद्यार्थ्यांनी हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात उंच पर्वतात कोरलेल्या अजिंठा लेण्यातील भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिल्प स्वरूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार विद्यार्थ्यानी यावेळी बघितला.बुद्धांच्या जातक कथांचा अभ्यास चित्र रूपाने केला.आधुनिक काळात वापरल्या वस्तू प्राचीन काळातसुद्धा अस्तित्वात होत्या हे चित्र शिल्प पाहून जाणून घेतले.लेण्यातील बारीक नक्षीकामाचे निरीक्षण करून त्यात असलेली नाविन्यता अनुभवली. अजिंठा लेणी बघायला आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत विद्यार्थ्यानी मुक्तपणे गप्पा गोष्टी…
साईमत जळगाव प्रतिनिधी समाजात शांतता प्रस्थापीत करणे, कायदा – सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. हातभट्टी वरील अनधिकृत दारूविक्रीला पायबंद बसवा यासाठी दारूबंदी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पोलीस विभागाकडून उगारण्यात येतो. यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०२३ या वर्षात ११हजार ९२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसला आहे. २०२१ व २०२२ या वर्षाच्या तुलनेत ही प्रतिबंधात्मक कारवाईत यावर्षी वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेकडून सीआरपीसी १०७, १०९ व ११० अन्वये तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असते. २०२१ या वर्षात ८८०६ व २०२२ या वर्षात…
साईमत जळगाव जळगाव सांस्कृतीक कार्य संचालनालयाच्यावतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ७ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. एका पेक्षा एक सरस विषय घेवून सादर झालेल्या नाटकांनी काही महत्त्वाच्या सामाजिक विषयात हात घालत रसिकांना खिळवून ठेवले. राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रांजल पंडित लिखित आणि चंद्रकांत कुमावत दिग्दर्शित फुपाखरू या नाटकाने झाली. शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या बाल कलाकारांनी हे नाटक सादर केले. चार मैत्रिणींच्या ‘काय खेळ खेळायचा’ या विचारातून आपापली स्वप्ने सांगण्याची संकल्पना सुचते. एक-एक करून त्या मैत्रिणी आपापले स्वप्न व त्या मागील कहाणी सांगू लागतात. आणि येथून सुरू होते फुलपाखरुची…
साईमत जळगाव जळगाव “ईव्हीएम मशीनला हटवा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, आणि लोकतंत्र वाचवा” या मागणीसाठी भारतातील ५६७ जिल्ह्यात मंगळवार दि. १६ रोजी एकाच वेळी निवडणूक आयोगाच्या असंवैधानिक कामकाजा विरोधात मोर्चाचे आयोजन मारत मुक्ती मोर्चा मार्फत करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव शाखेच्या वतीने शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास सुरुवात झाली. भारत मुक्ती मोचाचे खान्देश प्रभारी नितीन गाडे, जळगाव जिल्ह्य अध्यक्ष देवानंद निकम, बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सह संयोजक सौमित्र अहिरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम निवडणुका घेण्यात आल्या २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने…
साईमत जळगाव जळगाव भारतीय आट्यापाट्या महामंडळाच्या वतीने ७वी फेडरेशन चषक वरिष्ठ गट राष्ट्रीय आटयापाट्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोझिकोडे केरळ येथे दि १७ते १९ जानेवारी या कालावधीत होत आहे. या फेडरेशन चषक राष्ट्रीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेसाठी मंगला एक्सप्रेस ने भुसावळ येथून महाराष्ट्राचा संघ रवाना झाला . या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघाची घोषणा सचिव डॉ. अमरकांत चकोले यांनी केली आहे. पुरुष संघाच्या कर्णधार पदी अमरावती येथील सर्वेश मेन तर महिला संघाच्या कर्णधारपदी प्राची चटप भंडारा यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक भारतीय आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दीपक कवीश्वर, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे,…
साईमत जळगाव जळगाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून आरंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहेत.…
साईमत जळगाव जळगाव देशवासियांचे श्रध्दास्थान असलेले अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त जळगावात गेल्या ४ दिवसांपासून ‘आपली आस्था…आपले मंदिर’ अंतर्गत स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी बळीरामपेठ येथील पत्र्या हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली. अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ झाला. यानिमित्ताने जळगावात विविध उपक्रमांना उधाण आले आहे. शहरातील ३९९ वर्षे जुने असलेल्या बळीरामपेठेतील पत्र्या हनुमान मंदिरात मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी आ. सुरेश भोळे (राजूमामा) व मित्र परिवारांच्या हस्ते स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात युवक मंडळाने ही स्वच्छता मोहीम हाती…
साईमत जळगाव जळगाव महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्या वतीने आयोजित प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत वेळेचे व्यवस्थापन यावर व्याख्यान कार्यक्रमात व्याख्याते म्हणून भगीरथ कौन्सिलचे संचालक समुपदेशक पंकज व्यवहारे बोलत होते. यावेळी त्यांनी जीवनात ४ डी महत्त्वाचे असल्याचे सांगितले व वेळेचे व्यवस्थापन यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे.डी.सी.सी. बॅकेचे बॅकिंग व्यवस्थापक सुनिल पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आर.आर.पाटील , अतुल तोंडगांवकर, कर्मचारी युनियनचे हेमंत कुमार सांळुंखे, अनिल चौधरी, सुबोध सराफ, कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी उपस्थित होते. यावेळी कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी मंडळाच्या योजना उपक्रम व कार्यक्रम बाबत पी.पी.टी. सादर…
साईमत जळगाव जळगाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देऊन केलेल्या साफसफाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जळगाव तालुक्यातील विविध देवस्थानांची भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदिर, कानळदा येथील महर्षी कण्वाश्रम, रिधुर येथील अवचित हनुमान मंदिराचा त्यात समावेश होता. भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्यासोबत जळगाव तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल प्रल्हाद चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जगदीश सोनवणे, उपाध्यक्ष सचिन पवार, चिटणीस बाळकृष्ण कोळी तसेच समाधान सोनवणे, किनोद येथील नरेंद्र पाटील, फुपनगरी येथील ज्ञानेश्वर बडगुजर व इतर तरुणांनी तिन्ही देवस्थानांच्या साफसफाईचे काम पूर्ण केले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविलेल्या…