अयोध्येला जाणारे संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशजांचे जळगाव रेल्वे स्थानकावर स्वागत

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि २२ जानेवारी रोजी होत असून या सोहळ्याला जाण्यासाठी संत नामदेव महाराजांचे १७ वंशज ह. भ. प. निवृत्ती व मुरारी नामदास महाराज १० वारकरी बांधवांसह १९ जानेवारी रोजी कृषीनगर एक्सप्रेस ने निघाले आहेत. त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी श्रीराम च्या जय घोषात स्वागत करण्यात आले.
जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ७:१५ वाजता श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव तसेच गणनाम परीवार राम भक्तांच्या वतीने त्यांचा पुष्प हार व संस्थेचा मानाचा गमछा व भगवी शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक एकनाथराव बबन टेलर यांनी खास अयोध्येध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्यासाठी ५१ इंच श्रीरामाचा मोठा मंगल बॅच समहाराजांना कडे दिला. तसेच खान्देश चे प्रसिद्ध असलेले वांग्याचे भरीत, कळण्याची भाकर, ठेचा दत्तात्रय वारुळे व मनोज भांडारकर यांनी दिले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, कोषाध्यक्ष चेतन खैरनार, मनोज भांडारकर, सुरेशदादा सोनवणे, गणनाम परिवाराचे छोटू नेवे, राकेश शिरसाठ ,बापू खैरनार, सुधाकर कापुरे, संभाजी शिंपी, राजेंद्र शिंपी, प्रा. आर. बी. पाटील, दत्तात्रय वारुळे, एकनाथ सोनवणे, तुषार शिंपी, अनिल पाटील, रामचंद्र माळी, किशोर येवले, संतोष काळे, राजेंद्र वारूळे, बाल रामसेवक, प्रज्वल जगताप आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here