साईमत जळगाव प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेतून विजयी झालेल्या संघातून के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ मुली व २ मुले अशी सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिव्या ठाकरे, दिव्या झोपे, खुशी गुजर, विनिता पाटील या ४ मुली आणि आयुष बेंडाळे व वैभव बारी या २ मुलांची शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सदर स्पर्धा गारखेडा रोड छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात दि.२८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे के. सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, उपप्राचार्य करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, जिमखाना समिती चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.